HW News Marathi
मुंबई

शास्त्रज्ञ भास्कर दत्त यांचा बेपत्ता मुलगा नमनची नैराश्यामुळे आत्महत्या ?

मुंबई | मुंबईतील भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ भास्कर दत्त यांचा बेपत्ता मुलगा नमन दत्त याचा मृतदेह वाशी खाडीत सापडला आहे. नमन २३ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून बेपत्ता झाला होता. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. नमन हा काही दिवसांपासून नैराश्यात होता. त्याच्यावर नैराश्यातून बाहेर येण्यासाठी वैद्यकीय उपचार देखील सुरु होते. त्यांच्या घरातील एका व्यक्तीच्या निधनामुळे त्याला जबरदस्त धक्का बसला होता.

नवी मुंबईतील सेक्टर १७ मधील अर्चना ज्योती सोसायटीत वैज्ञानिक भास्कर दत्त आणि पत्नी मानसोपचार चंद्रा रामामुर्थी आणि त्याचा मुलगा नमन हे राहत होते. नमन दत्त हा केवळ १७ वर्षांचा होता. घारापुरी बेटावर एलिफंटा गुहांजवळ नमनचा मृतदेह सापडल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. मृतदेहाची अवस्था अत्यंत वाईट झाली होती त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळीच त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे .

नमन दत्तचे वडील भास्कर दत्त हे २३ सप्टेंबरच्या मध्यरात्री पाणी प्यायला उठले असता त्यांना नमन आपल्या खोलीत नसल्याचे आढळले होते. नमनने त्याला आलेल्या नैराश्यातूनच घर सोडून वाशी खाडीत उडी मारून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. पण ही आत्महत्या आहे कि हत्या असा प्रश्न याबद्दल अद्याप शंका व्यक्त करण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मॅनहोलमध्ये उतरलेल्या सिडकोच्या कंत्राटदारासह दोन कामगारांचा मृत्यू

News Desk

ओशिवरा बांधकाम व्यवसायीकाच्या घरात घुसून हत्या पत्नीवर हल्ला

News Desk

वंदे भारत एक्सप्रेसमुळे धार्मिक केंद्रांशी जोडण्याचे महत्त्वाचे काम पूर्ण! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Aprna
क्राइम

गौरी लंकेश हत्येप्रकरणी बेळगावमधून आणखी एक जण ताब्यात

Gauri Tilekar

बेळगाव | जेष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी आता अजून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. बेळगावमधील गणेशपूर येथील एका युवकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या युवकाचे नाव सागर असून त्याने गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर पळून जाण्यासाठी त्याच्या गाडीचा वापर करण्यात आल्याचा एसआयटीकडून संशय व्यक्त करण्यात येत आहे. गौरी लंकेश हत्याप्रकरणाशी जर सागरचे कोणत्याही प्रकारचे संबंध आढळले तर त्याला अटक करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

एसआयटीकडून बेळगावातून एक ओमनी कार जप्त करण्यात आली आहे. पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांनी हत्येनंतर याच ओमनीचा वापर करून तिथून पळ काढला असल्याचा संशय एसआयटीला आहे. तसेच ही ओमनी सागरची असल्याची शंकादेखील व्यक्त करण्यात येत आहे. १९ ऑगस्ट रोजी एसआयटीचे एक पथक बेळगावात दाखल झाले होते. सागर हा राजकारणाशी तसेच हिंदुत्त्ववादी संघटनेशी संबंधित असल्याची देखील माहिती समोर येत आहे. त्याचप्रमाणे आणखी तीन संशियितांची रेखाचित्रे देखील एसआयटीकडे आहे.

याआधी डॉ. दाभोळकर हत्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सचिन अंदुरेच्या जप्त करण्यात आलेल्या पिस्तूलातूनच गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली असल्याचा दावा सीबीआयकडून केला गेला होता. तसेच विरेंद्रसिंह तावडेसोबत मिळून सचिन अंदुरेने या हत्येचा कट रचला होता, असा दावा देखील सीबीआयने जिल्हा सत्र न्यायालयात केला होता.

Related posts

फेसबुक पोस्टमुळे काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या

swarit

सैन्यात भरती झालेल्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

News Desk

भाजपच्या नगरसेवकांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या

Aprna