HW News Marathi
मुंबई

रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज विशेष ‘मेगाब्लॉक’

मुंबई | पश्चिम, मध्य आणि हार्बर या तिनही मुंबई रेल्वेच्या मार्गांवर आज विशेष मेगाब्लॉक घेण्यात आल्याने प्रवास विस्कळीत होणार आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर रविवार 3 जून रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असून, यामध्ये ओव्हरहेड वायर, रुळांच्या देखभाल दुरुस्तीसाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते ठाणे डाऊन धिम्या मार्गावर सकाळी 11.20 ते दुपारी 4.20 पर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉक दरम्यान डाऊन धिम्या मार्गावरील वाहतूक डाऊन जलद मार्गावर चालविण्यात येणार असल्यामुळे या दरम्यान येणाऱ्या गाड्या विद्याविहार, कांजूर मार्ग,नाहूर रेल्वे स्थानकांवर थांबणार नाहीत.

हार्बर मार्गावर सीएसटी चुनाभट्टी-वांद्रे दरम्यान अप-डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते दु. 4.40 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असून, कुर्ला ते पनवेलपर्यंत विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगावपर्यंत सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 पर्यंत दोन्ही मार्गावर ब्लॉक आहे. यावेळेत सर्व जलद लोकल सांताक्रूझ ते गोरेगावपर्यंत धीम्या मार्गावर चालतील. ब्लॉकदरम्यान काही जलद मार्गावरील लोकल रद्द केल्या जाणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुर्ल्यात महापालिकेच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादीचे रास्तारोको आंदोलन

News Desk

अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना तीन दिवसीय पोलीस कोठडी

News Desk

मुंबईत डेंग्यूचे पाच तर लेप्टोचा एक बळी, आरोग्य खात्याचा अहवाल

swarit