HW News Marathi
मुंबई

चौपाटयांवर जीवरक्षक नेमण्याप्रकरणीचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला

मुंबई | देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील चौपाट्यांवर जीवरक्षक नेमण्या प्रकरणी पालिका स्थायी समितीत चांगलेच पडसाद उमटले आहेत. पालिका प्रशासनाने कोणतीही चौकशी न करता चौपाट्यांवर जीवरक्षक नेमण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी आणला. संबंधित कंत्राटदार काळ्या यादीतील असल्याने आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला असल्याने त्यास जोरदार आक्षेप घेत स्थायी समितीने प्रस्तावच फेटाळला. संबंधित कंत्राटदाराला सरकारी संस्थेने काळ्या यादीत टाकल्याने कंत्राटदाराला काम देऊ नये, अशी मागणी सदस्यांनी केली. त्यामुळे आता जीवरक्षक नेमण्याबाबत पालिका प्रशासन काय करणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे

मुंबईच्या गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, अक्‍सा, मनोरी आणि गोराई अशा सातही चौपाट्यांवर दररोज मुंबईकरांसह देश-विदेशांतील पर्यटकांची गर्दी होते. त्या ठिकाणी पालिकेचे 36 जीवरक्षक दोन पाळ्यांमध्ये तैनात असतात. त्यातील 12 जीवरक्षक कामयस्वरूपी आहेत. इतर जीवरक्षकांची कंत्राटी स्वरूपात नेमणूक करण्यात आली आहे. जीवरक्षकांची संख्या वाढून 93 इतकी करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिका 13 कोटी रुपये मोजणार आहे. जीवरक्षकांकडे लाइफ जॅकेट, रोप, सेफ्टी ट्युब, रिंग आदी सुविधा उपलब्ध असणार आहेत. गोव्याच्या धर्तीवर सुरक्षा व्यवस्था पुरवली जाणार असल्याचे प्रस्तावात नमूद आहे. दृष्टी लाईफ सेव्हिंग प्रा. लि. कंपनीला त्याचे कंत्राट देण्यात येणार होते; परंतु तिचा काळ्या यादीत समावेश असल्याने त्याविरोधात समितीत आक्षेप घेण्यात आला. दृष्टी लाईफ’च्या राजीव सोमाणी आणि नटवर सोमाणी यांच्या नावाने दृष्टी स्पोर्टस्‌ कंपनी होती. त्या कंपनीवर राज्य सरकारच्या महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने गुन्हा नोंदवला आहे. त्या कंपनीला पर्यटन मंडळाने काळ्या यादीत टाकले आहे. असे असताना त्यांना काम का देण्यात येत आहे, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला. संबंधित कंत्राटदाराला काम देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली. रवी राजा यांच्या मागणीला सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिला. त्याबाबत सविस्तर माहिती स्थायी समितीला सादर करण्याच्या सूचना करत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रस्तावच फेटाळला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पनवेल ग्रामीण डॉक्टर वेल्फेअरच्या वतीने केरळ पुरग्रस्तांना मदत

News Desk

धारावी पुनर्विकास प्रकल्पात आता राज्य सरकारचा सहभाग

Gauri Tilekar

कंगना राणावत बहिण रंगोली सोबत वांद्रे पोलिस स्थानकात हजर

News Desk
राजकारण

सरकारच्या हस्तक्षेपामुळे सुब्रम्हण्यम स्वामी नाराज

Gauri Tilekar

नवी दिल्ली | सीबीआयचे प्रमुख आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थान यांनी एकमेकांवर लाचखोरीचा आरोप लावले आहेत. सीबीआयनंतर अंमलबजावणी संचलनायतील (ईडी) अधिकाऱ्यावर होणार अशी नाराजची प्रतिक्रिया भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. सीबीआयमधील दोन अधिकाऱ्यांच्या अंतर्गत संघर्षमुळे त्या दोघांवर सरकारला कारवाई करण्याचा अधिकार नाही, अशा शब्दा मोदींच्या हस्तक्षेपावर खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सीबीआयच्या मागोमाग ईडीचा नंबर लागणार, सीबीआयची चौकशी पूर्ण झाल्यानंतर ईडीची चौकशी करणार असा इशारा सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला आहे.सीबीआय नंतर अंमलबजावणी संचालयातील अधिकारी राजेश्वर सिंह यांना त्यांच्या पदावरून निलंबित करण्यात येणार असल्याचे स्वामी यांनी केला आहे. ईडीचे अधिकारी राजेश्वर सिंह सध्या चिदंबरम यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांचा तपास करत आहेत.

Related posts

…तर मी शहांना भेटायला गेल्याच्या बातम्या येतील !

News Desk

आताचे अन् विधानसभेनंतरचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस !

News Desk

यवतमाळची आणीबाणी लादली आहे काय ?

News Desk