HW News Marathi
मुंबई

सुबोध जयस्वाल यांनी स्वीकारला मुंबईच्या आयुक्त पदाचा पदभार

मुंबई | मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून सुबोध जयस्वाल यांच्या नावाची आज घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रमुख सतीश माथूर आज सेवानिवृत्त झाले. तर राज्याच्या महासंचलाक पदावर दत्ता पडसलगीकर यांच्या नावाची वर्णी लागली आहे. पडसलगीकर यांच्याकडे मुंबईचे आयुक्तपद होते. पडसलगीकर महासंचालक झाल्यानंतर मुंबईच्या आयुक्तपदी सुबोध जयस्वाल यांची नियुक्ती आज करण्यात आली आहे. दुपारी साडेचारच्या सुमारास नवनिर्वाचीत आयुक्त म्हणून सुबोध जयस्वाल यांनी पदभार स्वीकारला आहे.

दत्ता पडसलगीकर देखील येत्या ऑगस्ट अखेरीस सेवाज्येष्ठतेनुसार निवृत्त होतील. मात्र त्यांची ३६ वर्षांची प्रामाणिक सेवा लक्षात घेऊन त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून एच डब्लू मराठी ला प्राप्त झाली आहे. त्यामुळे फेब्रुवारीपर्यंत पडसलगीकर महासंचालकपदी राहतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खासदार संजय राऊत यांच्यावर बेळगावमध्ये गुन्हा दाखल

News Desk

मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे विरोधात गुन्हा दाखल

News Desk

संविधान बदलू देणार नाही

News Desk