HW News Marathi
मुंबई

जलसिंचन घोटाळ्यातील आरोपी प्रवीण ठक्कर यांची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या

मुंबई | गोसीखुर्द जलसिंचन घोटाळ्यातील आरोपी आणि डी. ठक्कर कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे मालक प्रवीण ठक्कर यांचा मुलगा जिगर ठक्कर (४०) याने मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र पोेलिसांनी ठक्करच्या गाडीतून सिंचन घोटाळ्यासंदर्भातील काही कागदपत्रे ताब्यात घेतली असून त्याचा तपास सुरू आहे.

घाटकोपरला राहणारा जिगर सायंकाळी सहाच्या सुमारास चेंबूर येथील त्याच्या कार्यालयातील काम उरकून मरीन ड्राइव्ह येथील एका बँकेत आला होता. तेथून त्याने मरिन प्लाझा गाठले. नंतर त्याने चालक सुनील सिंग याला गाडी पार्क करायला सांगितले.ड्रायव्हरला बाजूला जायला सांगून त्याने आपल्याकडील परवाना असलेल्या रिव्हॉलवरमधून डोक्यात गोळी झाडून स्वत:ला संपविले. मरिन ड्राइव्ह पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन जीटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

म्हाडाच्या घरांसाठी लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध

News Desk

धक्कादायक ! गियर म्हणून चक्क बांबूचा वापर

News Desk

बाप्पाच्या दर्शनासाठी राणेंच्या घरी फडणवीस

News Desk