मुंबई । मुंबई शहर आणि उपनगरात शुक्रवारी (२६ जुलै) रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. ठाणे, नवी मुंबई परिसरातही पहाटेपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. रस्ते वाहतुकीवरही यामुळे परिणाम झाला आहे. गेल्या २४ तासात मुंबईत ५० ते १०० मिमी तर उपनगरांमध्ये १५० ते १८० मिमी पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. सांताक्रुझमध्ये १९२ मिमी तर कुलाब्यात ७३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
Mumbai: Water-logging at Road No. 6 in Sion, following heavy rainfall overnight #MumbaiRains pic.twitter.com/c8UwqDi3Do
— ANI (@ANI) July 27, 2019
पहाटेपासून सुरु झालेल्या जोरदार पावसामुळे सायन, दादर, वडाळा, माटुंगा, अंधेरी, कुर्ला, कांदिवली, जेव्हीएलआर परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे मुंबईसह उपनगरातील वाहतूक मोठा परिणाम झाला होता. मुंबई, उपनगर, ठाणेसह नवी मुंबईमध्ये येत्या २४ तासात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. आपल्या परिसरातील पावसाची स्थिती लक्षात घेऊन शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय राज्यातील मुख्याध्यापक घेऊ शकतात, अशा सूचना शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी दिल्या आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.