HW News Marathi
मुंबई

अशी असेल माल्ल्याची आर्थर रोड कारागृहात व्यवस्था

मुंबई | भारतीय बँकांचे तब्बल ९००० कोटी रुपयांचे कर्ज थकवून परदेशात पसार झालेल्या मद्यसम्राट विजय माल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी मुंबईतील आर्थर रोड तुरुंगामध्ये मोठी तयारी सुरु आहे. आर्थर रोड कारागृहामधील बराक क्रमांक १२ चे रूप संपूर्णपणे पालटण्याचे काम सध्या सुरु आहे. बराकमधील रंगकाम, टाइल्स तसेच बाथरूमची दुरुस्ती आणि नूतनीकरणाला गेल्या महिन्याभरापासून सुरुवात झाली आहे.

माल्ल्याच्या प्रत्यार्पण प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून कारागृहाच्या २ कोठड्यांच्या दुरुस्तीचे आणि नूतनीकरणाचे काम करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. प्रमेश कन्स्ट्रक्शन्स यांच्याकडे कारागृहाच्या दुरुस्तीचे कंत्राट देण्यात आले आहे. माल्ल्याच्या प्रत्यार्पणाची प्रकिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना आर्थर रोड कारागृहातच ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच याआधी कारागृहाच्या सुरक्षेसंदर्भातील अहवाल देखील इंग्लंडला पाठविण्यात आला आहे.

परंतु, कारागृहामध्ये डागडुजीची आवश्यकता असल्याने हे काम करण्यात येत आहे, असे स्पेशल आयजी दक्षिण मुंबई राज्यवर्धन सिन्हा यांचे म्हणणे आहे. तसेच कारागृहातील सर्वच कोठड्यांच्या दुरुस्तीचे आणि रंगकामाचे काम सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. आर्थर रोड जेलमध्ये नैसर्गिक प्रकाश येण्याची सोय नसल्याचे माल्ल्याने लंडन कोर्टात सांगितले होते. त्यानुसार सूर्यप्रकाशाच्या प्रतिबिंबासाठी कोठडीमध्ये एका भिंतीवर काळा रंग लावण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

News Desk

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर माजी नगरसेवकांना उद्धव ठाकरेंनी दिला ‘हा’ कानमंत्र

Aprna

गुढीपाडवानिमित्त खास श्रीखंड चीज केक तयार!

News Desk
देश / विदेश

दहशतवादी सय्यद सलाउद्दीनचा मुलगा एनआयएच्या ताब्यात

swarit

श्रीनगर | हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या सय्यद सलाउद्दीनच्या मुलाला मनी लाँड्रिंग प्रकरणी एनआयएने अटक केले आहे. सय्यद सलाउद्दीनच्या मुलगा शकील नाव असून त्याला श्रीनगरमधील रामबाग परिसराती त्याच्या घरातून एनआयएने अटक करण्यात आली आहे. शकीलने दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

शकील हा पेशाने लॅब टेक्निशियन आहे. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये सय्यद सलाऊद्दीनच्या दुसऱ्या मुलगा सय्यद शाहिद यालाही मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. शाहीदला सुद्धा एनआयएने त्याच्या विरोधात चार्जशीट दाखल केली आहे. शाहिद हा श्रीनगरमधील कृषी विभागात काम करत होता.

जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा परिसरात भारतीय लष्कराने एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. जवान आणि दहशतवादी यांच्यामध्ये गुरुवारी (३० ऑगस्ट) सकाळपासून चकमक सुरू आहे.

Related posts

सुपरस्टार रजनीकांत यांचे राजकारणात पदार्पण, लवकरच पक्ष स्थापन करणार!

News Desk

हेलिकॉप्टरचा दरवाजा तुटल्याने कोचीमध्ये २ नौसैनिकांचा मृत्यू

News Desk

शशिकलांना जेलमध्ये पाच रूम, टीव्ही संच

News Desk