HW Marathi
मुंबई

वीरपत्नी लेफ्टनंट स्वाती महाडिक याचा सन्मान

मुंबई | वीरपत्नी लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा एका कार्यक्रमात घर देऊन सन्मान करण्यात आला आहे. पती कर्नल संतोष महाडिक शहीद झाल्यानंतर स्वाती यांनी प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अकरा महिन्यांचं खडतर प्रशिक्षण पूर्ण केलं आणि त्या लेफ्टनंद पदावर रुजू झाल्या. त्यांच्या या जिद्दीला आणि संघर्षाला संघवी पार्श्व समूह कंपनीजच्या सीमा संघवी वेल्फेअर फाऊंडेशनकडून सलाम करण्यात आला आहे. आटगावमधील संघवी गोल्ड सिटी या प्रकल्पात स्वाती यांनी वन बीएचके घर देण्यात आलं आहे. या घराची किल्ली त्यांना नुकतीच सुपूर्द करण्यात आली.

काश्मीरच्या कुपवाडामध्ये दहशतवाद्यांनी दोन हात करताना कर्नल संतोष महाडिक यांना वीरमरण आलं. यानंतर स्ताती महाडिक यांनी लष्करात जाऊन देशसेवा करण्याची इच्छा व्यक्त केली होती. स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षेत यश मिळवल्यानंतर स्वाती यांनी अकरा महिन्यांचं खडतर लष्करी प्रशिक्षण पूर्ण केलं आणि त्या लेफ्टनंट पदावर रुजू झाल्या. स्वाती महाडिक यांनी दाखवलेल्या इच्छाशक्तीचा आणि जिद्दीचा सन्मान म्हणून सीमा संघवी वेल्फेअर फाऊंडेशनकडून त्यांना एक बीएचके घर भेट म्हणून देण्यात आलं. तुम्ही प्रत्येक भारतीयासाठी एक आदर्श आहात, अशा शब्दांमध्ये सीमा संघवी वेल्फेअर फाऊंडेशनकडून स्वाती महाडिक यांचं कौतुक करण्यात आलं आहे.

संतोष महाडिक यांनी देशासाठी हौतात्म्य पत्करल्यानंतर स्वाती यांनी लष्करात सेवा करण्याचा निर्धार केला होता. तेव्हापासून त्यांनी लष्करात दाखल होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पस्तीस वर्षांच्या स्वाती स्टाफ सिलेक्शनची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. या परीक्षेसाठी स्वाती यांचं वय अधिक होतं. मात्र संरक्षणमंत्र्यांनी त्यांनी वयाच्या बाबतीत सूट दिली. यानंतर अकरा महिन्यांचं कठोर लष्करी प्रशिक्षण पूर्ण करुन स्वाती महाडिक मोठ्या दिमाखात लष्करात लेफ्टनंट म्हणून दाखल झाल्या.

Related posts

कपिल वाधवान यांच्यासह २२ जणांवर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

News Desk

डॉनला झटका, चार हजार कोटींची मालमत्ता जप्त

News Desk

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk