HW News Marathi
मुंबई

साध्या वेषात मोहीम फत्ते !

मुंबई | पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते विरारदरम्यान लोकलच्या दरवाजात अडवणूक आणि दादागिरी करणाऱ्या टोळ्यांना आवर घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाने मोबाईलवरील ‘व्हॉट्सअॅप’चा खुबीने वापर केला आहे. लोकलच्या डब्यात साध्या वेषात हे आरपीएफचे जवान चढत असून डब्यात चढू न देणाऱ्यांचे चित्रण लागलीच पुढच्या स्थानकातील आपल्या सहकाऱ्याला मोबाईलवरून पाठवून कारवाई करीत आहेत. दोन दिवसांत 28 प्रवाशांवर अशा प्रकारे रेल्वे अॅक्टनुसार कारवाई करण्यात आली आहे.

हे आरपीएफचे जवान साध्या पोशाखात डब्यात चढतात. जर गाडीत चढताना कोणी धक्का मारला किंवा दरवाजा अडविले की पहिली टीम खाली उतरते आणि त्याच्यासोबतचा जवान मोबाईलवर कॅमेऱ्याने धक्का मारणाऱ्यांचा फोटो काढून पुढच्या स्थानकावरील तैनात जवानाच्या मोबाईलवर व्हॉट्सअॅपवरून पाठवितात. त्यानंतर गाडी त्या स्थानकावर पोहचल्यावर तेथे उभे असणारा स्टाफ संबंधित प्रवाशावर कारवाई करतात. अशा प्रकारे गुरुवारी १० जणांवर तर शुक्रवारी १८ जणांवर रेल्वे कायदा कलम १५६ नुसार कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ आणि संध्याकाळच्या ‘पिक अव्हर’च्या गर्दीत पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवलीच्या पुढचा प्रवास काळजात धडकी भरविणारा असतो. या प्रवासावेळी विविध ग्रूपद्वारे प्रवाशांना गाडीत चढू दिले जात नाही किंवा उतरण्यास मज्जाव केला जातो. जर मधल्या स्थानकात उतरायचे असेल तर उतरू दिले जात नाही. तसेच मारहाण करण्यापासून ते प्रवाशाला गाडीतून ढलकण्यापर्यंतची प्रकरणे यापूर्वी घडलेली आहेत. आम्ही जवानांच्या विविध टीम स्थापन केल्या असून सकाळच्या वेळी विरार ते बोरिवली तर संध्याकाळी उलट दिशेला बोरिवली ते विरार अशी कारवाई सुरू आहे, असे पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त अनुप शुक्ला यांनी म्हटले आहे.

पश्चिम रेल्वेवर सध्या दररोज १३५५ फेऱ्या चालविल्या जातात, तर दररोज ३६ लाख प्रवासी प्रवास करतात. १ नोव्हेंबरपासून आणखी १० फेऱ्यांची वाढ करण्यात येऊन एकूण १३६५ फेऱ्या चालविण्याचे नियोजन आहे. बोरिवली ते विरारदरम्यान रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने ‘डोअर ब्लॉकिंग ड्राइव्ह’ चालविला जात असून त्यासाठी ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ अशा टीम स्थापन करण्यात आल्या आहेत. त्यात महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सच्या जवानांची मदत घेण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

… हिंमत असेल तर ठाकरे कुटुंबाच्या संपत्तीची चौकशी करा – खासदार शेवाळे

News Desk

मॅनहोल्सच्या झाकणांची चोरी, पालिका हतबल

News Desk

बीआरटी टेंडरमध्ये मंत्र्याचा हस्तक्षेप ; मनसेचा आरोप

News Desk