HW News Marathi
मुंबई

पश्चिम रेल्वेची पावसाळ्यापुर्वी जय्यत तयारी

मुंबई | दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची लोकल सेवा सुरळीत रहावी यासाठी रेल्वेकडून पावसाळ्यापूर्वी तयारी करण्यात येते. सालाबादाप्रमाणे यंदाही तयारी करण्यात येत आहे. परंतु, यंदा पश्चिम रेल्वेवर मुंबईत पाणी तुंबणारी सात ठिकाणे निदर्शनात आली असून, त्यानुसार उपाययोजना केल्या जात असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

पावसाला सुरुवात झाल्यानंतर गाड्यांमध्ये बिघाड होऊ नये यासाठी पश्चिम रेल्वेकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. लोकल गाड्यांची दुरूस्तीही केली जात आहे. तसेच, डब्यांचे छत तपासले जातानाच इन्सुलेटरच्या सफाईचे कामही करण्यात येत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.

  • पावसाळ्यात कुठे कुठे तुंबते पाणी

    पावसाळ्यात ग्रँट रोड, एल्फिन्स्टन रोड, दादर, माटुंगा रोड ते माहिम यार्ड, वांद्रे ते खार, अंधेरी ते जोगेश्वरी आणि नालासोपारा ते विरार येथे पाणी तुंबण्याची शक्यता आहे. त्यामुळे हायपावर क्षमतेचे व पाणी उपसा करणारे १०० पंप मशिन बसविण्यात येणार आहेत असल्याती माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एसटी आगारातून खाजगी वाहतूकीला परवानगी देणाऱ्या मंत्र्यावर कारवाई करा

News Desk

मनसेला जशाच तसे उत्तर दिले, संजय निरुपमवर गुन्हा

News Desk

मोल्टन पेंग्विन सोबत राणीच्या बागेत गटारी साजरी

News Desk