पुणे:आठ महिन्याच्या पोटच्या लेकीला धरणात फेकून स्वत: आत्महत्या केल्याची घटना खडकवासला धरणाजवळ घडली. सुनील विजय दनाने (३२) असे मृत व्यक्तिचे नाव आहे. त्याचा मृतदेह सापडला असून मुलीचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. सुनील पत्नी आणि त्यांच्या आठ महिन्यांच्या मुलीसह खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला असणा-या पिकनिक स्पॉटवर सोमवारी सायंकाळी फिरायला आला होता. यावेळी त्याने पत्नीकडून मुलीला हिसकावून घेत तिला पाण्यात फेकून दिले. त्यानंतर स्वत: देखील पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केली.
प्रत्यक्षदर्शीनी आग्निशामक दलास दिलेल्या माहितीनुसार, खडकवासला धरण परिसरात सुनील विजय दनाने हे पत्नी आणि त्यांची आठ महिन्यांची मुलगी सोबत सोमवारी सायंकाळी ४ च्या सुमारास आला होता. धरणातून पाणी सोडलेल्या ठिकाणी गेल्यावर सुनील याने पत्नीकडून बाळाला हिसकावून घेतले. काही समजण्यापूर्वीच त्यांनी त्या बाळास पाण्यात फेकून दिले. तसेच स्वत: देखील पाण्यात उडी मारली. सुनीलच्या या कृत्यानंतर पत्नी बेशुध्द पडली. त्या ठिकाणी असणाºया नागरिकांनी तिला रुग्णालयात दाखल केले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.