नवी दिल्ली | भारत-चीनमधील सीमासंघर्ष चिघळायला सुरुवात झाली आहे. गलवान खोऱ्यात 15 जून रोजी रात्री भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये हिंसक झडप झाली. यात भारताचे तब्बल २० जवान शहीद झाले. देशभरातून मोठा संताप व्यक्त होऊ लागला. याच पार्श्वभूमीवर, भारत-चीन सीमाभागात निर्माण झालेल्या तणावपूर्ण स्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आज (१९ जून) संध्याकाळी ५ वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. दरम्यान, पंतप्रधानांनी बोलावलेल्या या सर्वपक्षीय बैठकीत देशभरातील २० राजकीय पक्षांचे अध्यक्ष सहभागी होणार असल्याची अधिकृत माहिती आहे. या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार आहे.
20 parties to attend PM's all-party meet on India-China border situation
Read @ANI story | https://t.co/761nEHNRaF pic.twitter.com/e5yMFQrVL6
— ANI Digital (@ani_digital) June 19, 2020
पंतप्रधानांच्या या सर्वपक्षीय बैठकीचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचाही सहभाग असणार आहे. या बैठकीत २० पक्षांचे अध्यक्ष उपस्थित राहणार असल्याची अधिकृत माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. दरम्यान, काहीच वेळापूर्वी पंतप्रधानांच्या या बैठकीत केवळ १७ राजकीय पक्षांचेच अध्यक्ष सहभागी होणार असून ३ राजकीय पक्षांना निमंत्रणच देण्यात आले नसल्याचे म्हटले जात होते. आम आदमी पार्टी, राष्ट्रीय जनता दल आणि टीडीपी या पक्षांना या बैठकीसाठी निमंत्रण नसल्याचे वृत्त होते. त्यामुळे मोठा वादही निर्माण झाला होता. मात्र, आता एकूण २० पक्षांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित असणार आहेत.
भारत-चीनच्या सैनीकांमध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झडपेत २० भारतीय जवान शहीद झाल्याने सर्वच स्तरांतून प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. “गलवान खोऱ्यात नेमके काय झाले ? केंद्राकडून, पंतप्रधानांकडून याबाबतची माहिती का देण्यात येत नाही ? चीनचे सैन्य आपल्या हद्दीत शिरलेच कसे ? भारतीय जवान त्यावेळी निशस्त्र का होते ? कोणतीही पूर्वसूचना का देण्यात आली नाही ?”, हे आणि यांसारखे अनेक प्रश्न उपस्थित झाले. गेल्या काळात केंद्रावर मोठ्या प्रमाणात टीका देखील झाली. याच पार्श्वभूमीवर, भारत-चीन सीमेवरील संघर्षाबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी ही सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या सर्वपक्षीय बैठकीत नेमकी काय चर्चा होते ? याकडे आता देशाचे लक्ष आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.