HW News Marathi
देश / विदेश

उत्तर भारतात ४१ पूरबळी!

पाटणा उत्तर भारतात पुराने थैमान घातले आहे. उत्तरेकडील १० राज्यांत आलेल्या या पुराने आतापर्यंत सुमारे ४१ जणांचा बळी घेतलाआहे. बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, आसामसह आदी १० राज्यांत महापुर आला आहे. दरम्यान, नेपाळच्या तराई भागात गेल्या चार दिवसांपासून अतिवृष्टी झाल्यामुळे तेथून येणाऱ्या जलप्रपाताने सखल भाग असलेलाबिहार जलमय झाला आहे. गंगेसह, कोसी, महानंदा नदीला पूर आला असून बिहारच्या किशनगंज, पूर्णिया, अररिया, कटिहार, पश्चिमचंपारण, सहरसा आणि सुपौलसह १२ जिल्ह्यांना त्याचा फटका बसला आहे. येथील रेल्वे, वीज आणि दूरसंचार सेवा ठप्प झाली असूनलष्कर, एनडीआरएफ, हवाई दलाने बचाव मोहीम हाती घेतली आहे. तब्बल ४० लाख लोकांना या पुराचा तडाखा सहन करावा लागत आहे. गेल्या ३-४ दिवसांपासून नेपाळमध्ये ३ ते १० पट अधिक पाऊस झाला आहे. नेपाळमध्ये प्रचंड पावसानंतर वाल्मीकीनगर गंडकबांधातून सुमारे १० लाख क्युसेक पाणी सोडण्यात आले. तसेच पूर्वांचलमध्येही मोठा पाऊस होत आहे. त्यामुळे बिहारमध्ये ३०० टक्केअधिक पाणी आले आहे.

३० वर्षांचा विक्रम मोडीत

ब्रम्हपुत्र नदी दुसऱ्यांदा दुथडी भरून वाहतेय. यात १० जणांचा मृत्यू झाला. राज्याच्या ७० टक्के भागांत पाणी आहे. यंदा पावसाने ३०वर्षांचा विक्रम मोडीत काढला आहे. कैलास मानसरोवर मार्गावर चौघे ठार पिथौरगड जिल्ह्यात कैलास मानसरोवर मार्गावर सोमवारी पहाटे ढगफुटी होऊन ३ जवानांसह चौघे ठार झाले असून 6 जण बेपत्ता आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पाकिस्तानला कर्ज देण्यास नकार

News Desk

‘आरक्षण तर भाजपच देईल म्हणणाऱ्या दानवेंचं तोंड बंद का होतं?’, विनायक राऊतांचा दानवेंवर हल्ला

News Desk

मोदींच्या मते SCAM म्हणजे सपा, काँग्रेस, अखिलेश व मायावती  

News Desk
राजकारण

कॉंग्रेसच्या आमदाराचा मराठा आरक्षणासाठी राजीनामा

News Desk

पंढरपूर | मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकारण रंगले असताना शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव आपल्या पदाचा राजीनामा दिला. मराठ्यांना आरक्षण दिले नाही तर आपण आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊ अशी घोषणा त्यांनी दिली होती. सरकारने आरक्षणाचे अद्यादेश काढले नाहीत म्हणून बोललेला शब्द पाळत आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पंढरपूरचे काँग्रेस आमदार भारत नाना भालके यांनी देखील राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या नावाने त्यांनी राजीनामा लिहला आहे.

सरकारने आतापर्यत आरक्षणाबाबत कोणतेच ठोस पाउल उचलले आमदार भालके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती प्राप्त झाली आहे. राज्यात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झालेले आहे, त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून मी आपल्या पदाचा राजीनामा देत आहे, असे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, या अगोदर शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव आणि राष्ट्रवादीचे आमदार भाऊसाहेब चिकटगांवकर यांनी आरक्षणासाठी आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

 

Related posts

Shekhar Gore Exclusive | मला आताच आमदार झाल्यासारखं वाटतंय !

News Desk

शिंदे सरकारने बहुमत चाचणीची अग्निपरीक्षा केली पास; तर महाविकास आघाडी फेल

Aprna

…तर असे सरकार कशाला चालवायचे ?, फडणवीसांचा शिवसेनेवर घणाघात

News Desk