HW News Marathi
देश / विदेश

तेलंगणामधील कोंडागट्ट घाटात बस कोसळून ४५ प्रवाशांचा मृत्यू

जगतियाल | तेलंगणामधील जगतियालमध्ये आज (११ सप्टेंबर) रोजी बसचा भीषण अपघात झाला आहे. कोंडागट्ट घाटात राज्य परिवहन निगमची बस उटल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात ४५ प्रवाशांचा मृत्यू झाला असून या अपघातात आतापर्यंत २० जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमी प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सिंधू शर्मा यांनी दिली आहे.

या बसमध्ये एकूण ६२ प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी ४५ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. बसचा ब्रेक फेल झाल्याने ही दुर्घटना झाल्याची माहिती मिळाली आहे. ही बस हनुमान मंदिर येथून जगतियाला जात असताना रस्त्या येणाऱ्या कोंडागट्टच्या घाटात हा अपघात झाला. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी या अपघाताबाबत शोक व्यक्त केला असून अपघातात मृतांच्या नातेवाईकांना सरकार पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींना चांगले उपचार देण्याचे आदेश दिले आहे.

 

Related posts

पंतप्रधान मोदींच्या हस्ते युपीमध्ये होणार १५०० कोटींच्या विकास योजनांचे उदघाटन!

News Desk

…पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘या’ मुख्यमंत्र्यांना पाठविला संदेश

अपर्णा

पश्चिम बंगालचे नाव ‘बांगला’ विधेयकाला मंजुरी

swarit