HW News Marathi
देश / विदेश

कोलकातामधील कालव्यात बस कोसळून, ६ जणांचा मृत्यू

कोलकाता | पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यामधील हरिपाल येथे एक बस कालव्यात कोसळून भीषण आपघात घडला आहे. या अपघातात ६ जणांता मृत्यू झाला असून २२ जाणांपैकी २ जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. हा अपघात मंगळवारी (१६ ऑक्टोबर) सकाळी ९ वाजताच्या सुमारास घटना घडील आहे. ही बस कोलकाताच्या दिशने जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सुकेश जैन यांनी दिली आहे. बस पुलावरील कठड्याला धडक बसल्याने कालव्यात कोसळली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“तुम्ही प्रचाराला येऊ नका”, बंगालमधील कॉंग्रेस नेत्याचे शरद पवारांना पत्र

News Desk

भाजपनेचं उदयनराजेंचा साताऱ्यात पराभव घडवून आणला, राऊतांचा खळबळजनक खुलासा..

News Desk

पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन

News Desk
राजकारण

गोवा पर्यायी मुख्यमंत्र्यांच्या शोधात

News Desk

पणजी | गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृतीच्या समस्येमुळे त्यांना राज्यासाठी पुरेसा वेळ देणे शक्य होत नाही. ही परिस्थिती लक्षात घेता राज्याकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून भाजप व सत्ताधारी आघाडीतूनकडून काल (सोमवार) नेतृत्वासाठी नव्या पर्यायी व्यक्तीचा शोध घ्यायला सुरुवात झाली आहे. या पर्यायी मुख्यमंत्रीपदासाठी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे नाव सुचविले जात आहे.

गोवा फॉरवर्ड पक्ष आणि मगोप यांच्या मते, आता गोव्याला नव्या मुख्यमंत्र्यांची तातडीने गरज आहे. कारण गेले अनेक दिवस पर्रीकरांची प्रकृती वारंवार बिघडत आहे. ते सध्या २४ तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. मात्र विश्वजित राणे यांच्या नावाला मगोपचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी मंजुरी दिलेली नाही. तर गोवा फॉरवर्डचे नेते मंत्री विजय सरदेसाई यांचा विश्वजित राणे यांना पाठिंबा आहे. भाजपाच्या आमदारांच्या आजच्या बैठकीत राजकीय स्थितीविषयी चर्चा झाली आहे.

दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये दीर्घकाळ उपचार घेतल्यानंतर मनोहर पर्रीकर रविवारी दोनापावला येथील आपल्या निवासस्थानी दाखल झाले होते. रविवारी सकाळी त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे त्यांना काही काळ अतिदक्षता विभागात नेण्यात आले होते. मात्र काही कालावधीनंतर त्यांना डिसचार्ज दिला गेला. पर्रीकरांना १५ सप्टेंबर रोजी एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. १७ किंवा १८ ऑक्टोबर रोजी दिल्लीत भाजप अध्यक्ष अमित शहा यांना भेटून सरकारमधील मंत्री ही राजकीय स्थिती त्यांना सांगणार आहेत.

Related posts

कोल्हापुरच्या अंबाबाईच्या दर्शनाने युतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार, जागावाटपचा तिढा कायम

News Desk

प्रकाश आंबेडकरांकडून काँग्रेसची स्तुती, राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्ला

Gauri Tilekar

पंतप्रधान मोदी एखाद्या सडकछाप माणसाप्रमाणे बोलतात, मेमन यांची जीभ घसरली

News Desk