HW News Marathi
देश / विदेश

बलात्कार प्रकरणी आसाराम बापूसह दोन जण दोषी, तर दोघांची सुटका

जोधपूर | अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जोधपूरच्या SC-ST न्यायालयाने आसाराम बापूला दोषी ठरवले आहे. न्यायालयाने हॉस्टल वॉर्डन शिल्पा व हॉस्टल डायरेक्टर शरद यांना आसाराम बापूसह दोषी ठरवले आहे. तर प्रकाश आणि शिवा या दोन आरोपींना बलात्कार प्रकरणी निर्दोष मुक्तता करण्यात आली. थोड्याच वेळात आसाराम बापूच्या शिक्षेवर सुनावणी होणार आहे.

आसाराम बापू हे गेल्या पाच वर्षापासून जोधपूर तुरुंगाची हवा खात आहेत. आसाराम भारतीय दंडविधान कलम 342, 376, 354-अ, 506, 509/34, जेजे अॅक्ट 23 आणि पोक्सो कायद्याच्या कलम 8 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. यानंतर जोधपूर पोलिसांनी आसाराम बापूला इंदूरमधून 31 ऑगस्ट 2013 रोजी अटक केले होते. तेव्हापासून आसाराम बापू जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात कैद आहे.

Related posts

सवर्ण आरक्षण विधेयकाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

News Desk

“महाराष्ट्र किती मोठा आहे ठाऊक आहे का?”, राष्ट्रपती राजवट लागू करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

News Desk

महाराष्ट्र दिनाच्या पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

News Desk