HW News Marathi
देश / विदेश

वर्षा अखेरीस पेट्रोल २० पैशांनी तर डिझेल २५ पैशांनी स्वस्त

नवी दिल्ली | नववर्षा आधीच सर्वसामान्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ते म्हणजे गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे. मुंबईत आज(३१ डिसेंबर) पेट्रोल २० पैशांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे मुंबईकरांना पेट्रोलसाठी ७४.४७ रुपये मोजावे लागणार आहेत. डिझेलच्या दरातही २५ पैशांची घट झाली आहे. त्यामुळे मुंबईत डिझेलचा दर ६५.७६ रुपये झाले आहे.

तसेच दिल्लीतही इंधनाचे दर घटले असून पेट्रोल २० पैशांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे एक लिटर पेट्रोलसाठी ६८.८४ रुपये मोजावे लागणार आहे. तर डिझेलच्या दरात २३ पैशांची घट झाली आहे. त्यामुळे दिल्लीत डिझेलचा दर ६२.८६ रुपयांवर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये घसरण होत आहे. इंधनाची किंमत डॉलरचा दर व आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे भाव यावर निश्चित होते. दोन महिन्यांपासून कच्चे तेल महाग झाले होते. परंतु आता ते काही प्रमाणात स्वस्त झाले आहे.

१६ ऑगस्टपासून इंधन दरवाढीस सुरुवात झाली होती. इंधन दरवाढ शंभरी गाठणार, अशी शक्यता वर्तवली जात असताना केंद्र सरकारने पावले उचलत पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात दीड रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला होता. तर १८ ऑक्टोबरपासून इंधन दरांमध्ये सातत्याने घसरण होत असून, पेट्रोल दरात आत्तापर्यंत १३.७९, तर डिझेलच्या दरात १२.०६ रुपयांची घसरण झाली. याआधी ४ ऑक्टोबर रोजी मुंबई व दिल्लीत पेट्रोलचे दर अनुक्रमे ९१.३४ व ८४ रुपयांवर, तर डिझेलचे दर ८०.१० व ७५.४५ रुपयांवर गेले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चिमुकलीच्या तोंडात सुतळी बॉम्ब ठेऊन पेटवला

swarit

अँगेला मार्कल चौथ्यांदा चॅन्सलर

News Desk

तेलंगणामध्ये पार पडला समलैंगिक जोडप्याचा विवाह सोहळा

Aprna