मुंबई | काँग्रेसने काल (१० सप्टेंबर) रोजी संपुर्ण देशात भारत बंद पुकारला होता. यात काँग्रेसने यशस्वीरित्या बंद झाल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला होता. पेट्रोलमध्ये आज (११ सप्टेंबर) १४ पैशांने आणि डिझेल १५ पैशांनी दरवाढ झाली आहे. म्हणजे पेट्रोल प्रति लिटर ८८.२६ रुपये तर डिझेल ७७.४७ रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. तर परभणीत पेट्रोल ९०.०५ रुपये तर डिझेल ७७.४७ रुपयांनी उच्चांक गाठला आहे.
Petrol at Rs 88.26/litre (increase by Rs 0.14/litre) and diesel at Rs 77.47/litre (increase by Rs 0.15/litre) in #Mumbai. Locals say, 'Prices are increasing everyday. We appeal to the govt to reduce the prices. We will be less burdened if they do so.' #Maharashtra pic.twitter.com/3ELuGhLnw7
— ANI (@ANI) September 11, 2018
तसेच दिल्लीत पेट्रोल-डिझेलमध्ये प्रत्येकी १४ पैशांनी वाढले आहे. त्यानुसार आज दिल्लीत पेट्रोल ८०.८७ रुपये तर डिझेल ७२.९७ रुपये सामान्यांना मोजावे लागणार आहेत. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.
Fuel prices continue to soar with petrol being sold at Rs 80.87 and diesel at Rs 72.97 per litre in New Delhi
Read @ANI Story | https://t.co/pPvUMYQf8Y pic.twitter.com/xX23w3WwYw
— ANI Digital (@ani_digital) September 11, 2018
काँग्रेसच्या वतीने काल भारत बंदची हाक दिली होती. या बंदला २१ प्रादेशिक पक्षांनी पाठिंबा दिला होता. या बंदात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेसह कार्यकर्त्ये रस्त्यावर उतरून मोदी सरकार विरोधात निषेध व्यक्त केला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.