राची। महाराष्ट्र पाठोपाठ भाजपच्या हातातून झारखंड देखील गेले आहे. झारखंडमधील विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपची पिछेहाट झाली आहे. झारखंडमध्ये काँग्रेस-झारखंड मुक्ती मोर्चा व राष्ट्रीय जनता दल यांच्या आघाडीने ८१ पैकी ४७ जागांवर विजय मिळविला असून भाजपला २६ जागांवरच विजय मिळाला आहे. झामुमोचे नेते हेमंत सोरेन हेच राज्याचे मुख्यमंत्री होणार, हे स्पष्ट झाले आहे. भाजपचे नेते व मुख्यमंत्री रघुबर दास यांच्यासह त्यांच्या पाच मंत्र्यांचा जनतेने निवडणुकीत पराभव केला.
झारखंडमध्ये एकूण ८१ जागांवर मतदान झाले होते. प्रचारात सत्ताधारी भाजप विरुद्ध झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस-राष्ट्रीय जनता दल यांच्या आघाडीत सरळ सामना झाला. बहुमतासाठी लागणारा ४१ आकडा असून काँग्रेस आघाडीने ४६ जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे काँग्रेस आघाडीचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. झारखंडमधील काही जागांवर अत्यंत चुरशीची लढाई पाहायला मिळाली. काँग्रेस, भाजप यांचे उमेदवार काहीशा फरकाने जिंकलेले पाहायला मिळाले.
I thank the people of Jharkhand for having given @BJP4India the opportunity to serve the state for many years. I also applaud the hardworking Party Karyakartas for their efforts.
We will continue serving the state and raising people-centric issues in the times to come.
— Narendra Modi (@narendramodi) December 23, 2019
झारखंडमधील विजयाबद्दल हेमंत सोरेन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत अभिनंदन केले. सोरेन यांना शुभेच्छा देताना मोदी यांनी म्हटले आहे की, आमचा राज्यात पराभव झाला असला तरी राज्यातील जनतेच्या प्रश्नांसाठी भाजप सतत आवाज उठवत राहील. झारखंडमधील भाजपच्या कार्यकर्त्यांच्या अधिक परिक्रमाचे देखील कौतुक मोदींनी केले. गेली पाच वर्षे झारखंडमधील जनतेने आम्हाला जी सेवेची संधी दिली, त्याबद्दल मी जनतेचा आभारी आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.