HW News Marathi
देश / विदेश

महात्मा गांधींबाबत हेगडेंचे वादग्रस्त वक्तव्य, देशातील राजकारण पेटण्यास सुरुवात

नवी दिल्ली | माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार अनंतकुमार हेगडे यांनी हे नेहमी वादग्रस्त विधानामुळे चर्चेत राहिले आहे. आता सुद्धा अनंतकुमार हेगडेंनी महात्मा गांधींबाबत अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केले. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली लढलेला भारताचा स्वातंत्र्य लढा हा नाटकी होता, असे वादग्रस्त विधान हेगडेंनी केले आहे. बेंगळुरूतील एका कार्यक्रमात अनंतकुमार हेगडेंनी हे वक्तव्य केले आहे. हेगडे उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत.

“महात्मा गांधींचा स्वातंत्र्यलढा हा ब्रिटीश सरकारच्या परवानगी आणि पाठिंब्यानेच रचला गेला होता. त्याचप्रमाणे ‘त्या’ तथाकथित नेत्यांनी एकदाही पोलिसांचा मार खाल्ला नव्हता. हा स्वातंत्र्य लढा नाटकी आणि एकमेकांच्या पाठिंब्याने रचला गेला होता,” असे वादग्रस्त वक्तव्य अनंतकुमार हेगडेंनी केले आहे. यानंतर हेगडेवरांवर देशभरातील सर्व स्तरातून टीका होत आहे. हेगडेंनी महात्मा गांधींवर केलेल्या वक्तव्यावर त्यांनी माफी मागण्याची मागणी केली आहे.

“हेगडे यांचे वक्तव्याची दखल घेऊ नये असे वाटले. एखाद्या व्यक्तीच्या अकलेचे दिवाळे निघाल्यानंतर जसा तो बलतो तसे ते बोललेत, अशा शब्दात राज्याचे कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध नोंदवली आहे. थोरात पुढे म्हणाले की, “भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या विचारांची लोक स्वांतंत्र्यलढ्यात कुठे होती, असा प्रश्न विचारला तर ते इंग्रजांना साथ देत होते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महात्मा गांधींच्या चळवळीला नाटक होते, असे म्हणणे हे कुणालाच पटणार नाही” असे निषेध व्यक्त केला आहे.

यापूर्वी हेगडेंनी केलेली वादग्रस्त विधान

यापूर्वी हेगडेंनी वादग्रस्त विधान “आम्ही संविधानात बदल करण्यासाठी सत्तेत आलो आहोत आणि आगामी काळात आम्ही संविधानात बदल करु.” हे विधान डिसेंबर २०१७ मध्ये कर्नाटकमधील कोप्पाल जिल्ह्यातील एका कार्यक्रमादरम्यान केले आहे. “सबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशाला विरोध करणाऱ्या आंदोलनात केरळ सरकारकडून आंदोलकांची हाताळणी दिवसाढवळ्या हिंदूंच्या बलात्कारासारखी आहे. २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर वक्तव्य केले होते. हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी इतर धर्मातील जे कुणी हिंदू मुलींना हात लावतील त्यांचे हात छाटून टाकावे आणि इतिहास घडवावा.” जानेवारी २०१९मध्ये असे म्हणाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘अग्निपथ’ योजनेविरोधातील आंदोलनाकर्त्यांसाठी लेफ्टनंट जनरल अनिल पुरींची ‘ही’ महत्वाची माहिती

Aprna

ओबामांच्या कार्यलयात तर हिलरी क्लिंटनच्या घरात सापडली स्फोटके

News Desk

आरबीआयकडून दिलासा, नाबार्ड, लघुउद्योग, नॅशन हाऊसिंग बँकांसाठी ५० हजार कोटींची मदती

News Desk