HW News Marathi
देश / विदेश

केंद्र सरकारने घातली ‘टिक-टॉक’वर बंदी, सोशल मीडियावर मिमचा पाऊस

नवी दिल्ली । तरुण-तरुणीमध्ये टिक-टॉक अ‍ॅप कमी वेळातच लोकप्रिय झाले. टिक-टॉकमुळे अनेकांना त्यांच्यातील गुणांनावाव मिळाला. परंतु आता केंद्र सरकारच्या आदेशनुसार टिक-टॉकवर बंदी घालण्यात आली आहे. केंद्र सरकारने गुगलला प्ले स्टोअरमधून टिकटॉक अ‍ॅप काढण्यास सांगितले आहे. या आदेशानंतर लोकांना टिकटॉक अ‍ॅप डाउनलोड करता येणार नाही. यानंतर सोशल मीडियावर टिक टॉकच्या चहात्यांनी विविध मिमद्वारे सरकारच्या आदेशाचा विरोध करत आहेत.

मात्र ज्या लोकांकडे आधीपासून हा अ‍ॅप आहे, त्यांना तो पहिल्यासारखा वापरता येईल. सर्वोच्च न्यायालयात काल(१६एप्रिल) झालेल्या सुनावणीनंतर माहिती व प्रसारण मंत्रालयाने हा आदेश काढला आहे. टिकटॉक अ‍ॅप तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. मात्र काही जण या अ‍ॅपचा गैरवापर करून, अश्लील चित्रफितींना प्रोत्साहन देतात, असा आरोप करत त्याविरोधात मद्रास उच्च न्यायालयाने याचिका दाखल झाली होती. न्यायालयाने या अ‍ॅपवर बंदीचा निर्णय दिला. त्यानंतर टिकटॉकने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चीनची पुन्हा भारतात घुसखोरी

Gauri Tilekar

“मविआ सरकारने एक उमेदवार मागे घ्यावा, मग घोडेबाजाराचा प्रश्नच उरत नाही,” फडणवीसांची प्रतिक्रिया

Aprna

…म्हणून २ हजारच्या नोटांची छपाई बंद

News Desk