नवी दिल्ली | महाराष्ट्र आणि हरियाणानंतर आता दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आज (६ जानेवारी) पत्रकार परिषद आयोजित केली. यात निवडणूक आयोगाने दिल्लीत आजपासून आचारसंहिता लागू झाल्याची माहिती दिली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीचे मतदान ८ फेब्रुवारीला एका फेरीत होणार आहे. तर ११ फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेची मतमोजणी होणार आहे. दिल्लीत आता जवळपास १ कोटी ४६ लाख मतदारांची संख्या असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच तयारी पूर्ण झाल्याची माहिती मुख्य निवडणूक आयोगाने सुनील आरोरा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
Chief Election Commissioner Sunil Arora on Delhi assembly elections: The Model Code of Conduct shall be applicable for Delhi with immediate effect. https://t.co/3V1hf0D6QT
— ANI (@ANI) January 6, 2020
”दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी अधिसूचना १४ जानेवारी रोजी जारी होईल. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी २१ जानेवारी ही शेवटची तारीख आहे. तर निवडणुकीच्या उमेदवारी अर्जांची छाननी २२ जानेवारीला होणार असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २४ जानेवारी आहे,” असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.