HW News Marathi
Covid-19

देशात कोरोनाचा उद्रेक! २४ तासांत १ लाख ६१ हजारांच्या पुढे कोरोना रुग्ण आढळले

नवी दिल्ली | देशात कोरोनाचा उद्रेक वाढत चालला आहे. देशात भारतात गेल्या २४ तासात १ लाख ६१ हजार रुग्णांची नोंद झाली आहे. तर ८७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्वाची बाब म्हणजे देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ कोटी ३६ लाख ८९ हजार ४५३ इतकी झाली आहे. देशात सध्याच्या घडीला १२ लाख ६४ हजार ६९८ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

सोमवारी देशात एकाच दिवसात १ लाख ६८ हजार ९१२ कोरोना रुग्ण आढळले असून आतापर्यंतचा हा उच्चांक मानला जात आहे. देशात आतापर्यंत १ कोटी २२ लाख ५३ हजार ६९७ करोना रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर १ लाख ७१ हजार ५८ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान देशात १० कोटी ८५ लाख ३३ हजार ८५ जणांचं लसीकरण झालं आहे.

स्पुटनिक ५’ लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी

रशियाच्या ‘स्पुटनिक ५’ लशीला भारतात आपत्कालीन वापराची परवानगी देण्याबाबतच्या डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजच्या अर्जावर केंद्रीय औषध नियामक संस्थेच्या तज्ज्ञ समितीने काल चर्चा केली. लशीची सुरक्षितता आणि परिणामकारकतेसंबंधीच्या तपशिलाची पडताळणी केल्यानंतर समितीने ‘स्पुटनिक ५’ लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली. आता ‘स्पुटनिक ५’ लशीच्या वापराबाबत भारताचे औषध महानियंत्रक अंतिम निर्णय घेतील. त्यांनीही मंजुरी दिल्यास ‘कोव्हिशिल्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’नंतर भारताच्या कोरोनाविरोधी लढ्यात ‘स्पुटनिक ५’ या तिसऱ्या लशीचे बळ मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लहान मुलांना रेमडेसिविर देऊ नका, आरोग्य मंत्रालयाकडून गाईडलाइन्स जारी

News Desk

राज्यात आज १४ हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित, तर ३३९ जणांचा मृत्यू

News Desk

विद्यार्थ्यांनी चिंता करू नये, येत्या २ दिवसांत चित्र स्पष्ट होईल !

News Desk