HW News Marathi
Covid-19

देशात कोरोना कहर! १ लाख ८४ हजारांपेक्षा जास्त रुग्ण २४ तासांत आढळले

नवी दिल्ली | संपूर्ण जगभरात कोरोनाचा उद्रेक जालेला पाहायला मिळत आहे.जगातील कोरोना रुग्णांची संख्या ही आता तब्बल १३ कोटींच्या पुढे गेली असून लाखो लोकांना यामुळे जीव गमावला आहे. कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. गेल्या २४ तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली असून चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत आहे.

गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे १,८४,३७२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १०२७ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या १,३८,७३,८२५ वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात १,७२,०८५ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. सध्या देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या एक कोटीवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा दीड लाखांच्यावर पोहोचला आहे.

महाराष्ट्रातही कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ६०,२१२ नवे रुग्ण आढळले आहेत तर ३१,६२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच, आजपासून (१४ एप्रिल) पुढील १५ दिवस संचारबंदी लागू केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जनतेला याबाबत माहिती दिली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात दिवसभरात ५६ हजार ६४७ नवीन कोरोनाबाधित, ६६९ रूग्णांचा मृत्यू

News Desk

देशात कोरोना रुग्ण संख्येचा विस्फोट, २४ तासांत आढळले ३ लाखांच्या पुढे रुग्ण

News Desk

चीनप्रमाणे भारताला कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आणता येईल?

News Desk