HW News Marathi
देश / विदेश

Union Budget 2021 |  मिशन पोषण 2.0 ची अर्थमंत्र्यांकडून घोषणा

नवी दिल्ली | आज (१ फेब्रुवारी) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पेपरलेस अर्थसंकल्प असणार आहे. या अर्थसंकल्पाची स्फॉट कॉपी असणार आहे. अर्थसंकल्पाच्या सुरुवातीला निर्मला सीतारामण यांनी मोदी सरकारच्या या काळात काय काय गोष्टी लोकांना दिल्या त्या सविस्तरपणे सांगतल्या. मोदी सरकारने आत्मनिर्भर भारतला सुरुवात केली त्याचे फायदेही यावेळी त्यांनी सांगतिले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविंद्रनाथ टागोरांच्या वचनाची आठवण करून दिली… ‘ज्यावेळी पहाट अंधारलेली असते त्यावेळी विश्वास हाच आशेचा किरण असतो’, या वचनाची आठवण करुन दिली.

निर्मला सीतारामण यांनी मांडलेले महत्वाचे मुद्दे –

बजेटमध्ये आत्मनिर्भर भारतचं व्हिजन

देशात नव्या आरोग्य संस्था उभारणार

आरोग्य संस्थांच्या बळकटीकरणाचा प्रयत्न

नवीन आरोग्य योजनांवर ६४ हजार कोटींची तरतूद

कोविड लसीकरणासाठी ३५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली.

आत्मनिर्भर भारत पॅकेजेसमुळे जो आर्थिक सकारात्मक परिणाम झाला तो २७.१ लाख कोटी रुपयांचा म्हणजे जीडीपीच्या १३ टक्क्यांपेक्षा जास्त होता

सरकारचा महिला सशक्तिकरणावर जोर

कुपोषण संपवण्याचा सरकारचा प्रयत्न.

आज भारतात दोन लस उपलब्ध आहेत आणि त्यांनी केवळ देशातील नागरिकांनाच नव्हे तर १००किंवा त्याहून अधिक देशांच्या नागरिकांनाच संरक्षण दिले आहे.

आणखी दोन लस देखील लवकरच मिळण्याची शक्यता.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Coronavirus : दिलासादायक ! काल एकाच दिवशी ७०५ जण कोरोनामुक्त

News Desk

हरियाणाच्या सुषमा स्वराज यांची रंजक प्रेम कहाणी

News Desk

मतदार नोंदणीची तारीख ३० नोव्हेंबरपर्यंत करण्यात यावी !

News Desk