नवी दिल्ली | भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज ३४ वी पुण्यतिथी आहे. या निमित्ताने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी शक्तीस्थळावर जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक नेत्यांनी इंदिरा गांधींना श्रद्धांजली वाहिली आहे.
Congress President Rahul Gandhi, former PM Manmohan Singh and Sonia Gandhi pay floral tribute at Shakti Sthal, the memorial of former PM Indira Gandhi on her death anniversary. pic.twitter.com/2Cm8GIz6rk
— ANI (@ANI) October 31, 2018
राहुल गांधींनी ट्विटरवर इंदिरा गांधी यांच्या आठवणींना उजाळा दिला. “आजीने मला खूप काही शिकवलं आणि माझ्यावर अतिशय प्रेम केलं. तिने जनतेसाठी बरंच काही केलं. मला तिचा अभिमान आहे,” अशा शब्दात राहुल गांधींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
Remembering Dadi today with a deep sense of happiness. She taught me so much and gave me unending love. She gave so much of herself to her people. I am very proud of her.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 31, 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर इंदिरा गांधींना श्रद्धांजली वाहिली आहे.
Tributes to our former Prime Minister, Mrs. Indira Gandhi on her death anniversary.
— Narendra Modi (@narendramodi) October 31, 2018
तर ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी नवी दिल्लीतील १, सफदरजंग रोड, इथल्या निवासस्थानी अंगरक्षकांनीच इंदिरा गांधी यांची हत्या केली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.