HW News Marathi
देश / विदेश

मोदी म्हणतात, “टायगर जिंदा है”

नवी दिल्ली | आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (२९ जुलै) जनतेला संबोधित केले आहे. जगामध्ये सध्या वाघांची घटती संख्या पाहून चिंताजनक वाटत असल्याचे मोदी म्हणाले. भारतात सध्या ३ हजार वाघ शिल्लक आहेत. अखिराष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या माहितीनुसार भारतात २०१४च्या तुलनेत वाघांची संख्या ७४१ने वाढली आहे. याचप्रमाणे देशात झालेल्या जनगणनेनुसार २२२६ वाघ होते, २०१०मध्ये वाघांची संख्या १ हजार ७०६ तुलनेत जास्त आहेत. सध्या देशात २ हजार ९६७ वाघ आहेत.

मोदी वाघांच्या संख्येसंदर्भात रिपोर्ट जारी करत म्हणाले की, “आजही वाघांची सुरक्षा करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. भारतात वाघांची वाढत असलेल्या संख्येने प्रत्येक देशवासीय नक्कीच आनंदाची बातमी आहे. जवळपास ९ वर्षांपूर्वी सेंट पीटर्सबर्गमध्ये २०२२पर्यंत वाघांची संख्या दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आपण हे लक्ष्य ४ वर्षांतच पूर्ण केले आहे. जगभरात वाघांची संख्या घटत असल्याबाबत त्यांनी चिंताही व्यक्त केली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जगातील सर्वांत उंच गावात दुष्काळ

News Desk

ट्विटरकडून ‘ती’ चूक दुरुस्त! उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या अकाऊंटला पुन्हा ‘ब्लू टिक’

News Desk

ब्रिटनमधील भीषण अपघातात ४ भारतीय ठार

News Desk