HW News Marathi
देश / विदेश

सुनील अरोरा मुख्य निवडणूक आयुक्तपदी विराजमान 

नवी दिल्ली | सुनील अरोरा यांनी आज (२ डिसेंबर) केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त पदभार स्वीकारला असून २०१९ साली होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका सुनील अरोरा यांच्या कार्यकाळात होणार आहेत. ६२ वर्षीय अरोरा हे १९८० च्या राजस्थान केडरचे सेवानिवृत्त अधिकारी आहेत. राजस्थानमध्ये प्रशासकीय सेवेत असतानाअरोरा यांनी विविध विभागाचे कामकाज पाहिले आहे.

त्याचबरोबर त्यांनी केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण विभागाचे सचिव आणि कौशल विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे सचिव म्हणूनही काम पाहिले आहे. त्याचबरोबर अर्थ आणि वस्त्रोद्योग आणि योजना आयोगाच्या विविध पदांवरही त्यांनी काम केले आहे. ते १९९३ ते १९९८ पर्यंत राजस्थानच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे सचिव आणि २००५ ते २००८ पर्यंत मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून काम केले आहे. सप्टेंबर २०१७ मध्ये त्यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Coronavirus : देशात गेल्या २४ तासांत १००७ कोरोना पॉझिटिव्ह

News Desk

“नाशिक पदवीधर निवडणुकीसंदर्भात उद्या अंतिम निर्णय”, अजित पवारांची माहिती

Aprna

WomensDay2019 : स्वतःसाठी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या ‘या’ महिलांचा प्रेरणादायी प्रवास

News Desk