HW News Marathi
देश / विदेश

अमेरिकेडून भारताला दिवाळी भेट

नवी दिल्ली । अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची कोंडी करण्यासाठी ५ नोव्हेंबरपासून नव्याने लागू निर्बंध लावले होते. या निर्बंधा अंतर्गत इराणकडून तेल खरेदी पूर्णत: थांबविण्याचे निर्देश प्रशासनाने जगभरातील देशांना दिले होते. परंतु या निर्बंधात मात्र भारतासह आठ देशांना इराणकडून कच्चे तेल खरेदी करण्याची सवलत देण्याचे अमेरिकेने मान्य केल्यामुळे जणू भारतला दिवाळी गिफ्ट मिळाले आहे.

अमेरिकेने इराणकडून तेल खरेदी थांबविण्याचे निर्देश जगभरातील देशांना दिले होते. अमेरिकेच्या या निर्णयाचे भारताने आक्षेप घेतला होता. इराणकडील तेलखरेदी बंद केल्यास जगभरात कच्च्या तेलाच्या किमती भडकतील. त्यामुळे तडजोडीचा मार्ग म्हणून ट्रम्प प्रशासनाने आठ देशांना इराणकडून तेल खरेदीची सवलत दिली आहे. या सवलतीत भारतासह जपान व दक्षिण कोरिया यांचा या देशांत समावेश आहे. चीन हा इराणी तेलाचा सर्वांत मोठा आयातदार आहे. उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, ही सवलत तात्पुरती असणार आहे.

भारताने इराणच्या तेलाची आयात तब्बल ३0 टक्क्यांनी कमी केली आहे. इराणचे तेल आयात करण्यात अमेरिकेकडून सवलत मिळावी, यासाठी ही कपात करण्यात आली आहे. या आधारावर अमेरिकेने भारताला निर्बंधांतून सवलत दिली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘सरकार फक्त लोकांना फुकट पगार देण्यासाठी आहे का?, गडकरींनी अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर  

News Desk

न्या. लोया मृत्यूप्रकरण | चौकशीची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली

News Desk

बडगाममध्ये दोन दहशदवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश

swarit