HW News Marathi
देश / विदेश

डीएमके पक्षाचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांची प्रकृती बिघडली

चेन्नई | डीएमके पक्षाचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. करुणानिधी सध्या ९४ वर्षांचे आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून ते आजारी आहेत. शुक्रवारी प्रकृतीतील सुधारणेनंतर त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले होते. मात्र, मध्यरात्री १.३८ वाजता पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आला. रक्तदाब कमी झाल्याने त्यांना शारीरिक त्रास सुरु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सध्या चेन्नईतील गोदावरी रुग्णालयात करुणानिधी यांच्या उपचार सुरू आहेत.

करुणानिधींच्या शरीरातील ताप आणि संसर्ग वाढत चालला होता. त्यामुळे त्यांना शुक्रवारी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी नेण्यात आले. त्यावेळी डीएमकेचे कार्यकारी अध्यक्ष स्टॅलिन यांनीही, करुणानिधींची प्रकृती सुधारत असल्याचे सांगितले होते. मात्र, मध्यरात्री अचानक त्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मोदींनी देशाला भूक, बेरोजगारी व आत्महत्या हे तीन पर्याय दिले”, राहुल गांधी पुन्हा गरजले

News Desk

टेनिसपटू मारिया शारापोव्हाविरूद्ध दिल्लीत गुन्हा दाखल

News Desk

दीड लाख लोक मंगळवार जाणार

News Desk