नवी दिल्ली | देशात पुन्हा एकदा निवडणुकीचे वारे वाहु लागले आहेत. ५ राज्यातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची आज (२४ फेब्रुवारी) बैठक पार पडणार आहे. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, पुद्दुचेरी, आसाम आणि केरळ या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणावर निवडणुका पार पडणार आहेत. याआधी कोरोना काळात बिहार विधानसभेची निवडणूक यशस्वीरित्या पार पडली आहे. तामिळनाडू विधानसभेचा कार्यकाळ २४ मे रोजी, पश्चिम बंगालचा कार्यकाळ ३० मे रोजी, आसाम विधानसभेचा कार्यकाळ ३१ मे रोजी संपुष्टात येत आहे. तर केरळ विधानसभेचा कार्यकाळ १ जून रोजी आणि पुद्दुचेरी विधानसभेचा कार्यकाळ ८ जून रोजी संपत आहे.
एप्रिल, मे मध्ये होऊ शकते निवडणूक
पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी या राज्यांतील विधानसभांचा कार्यकाळ मे आणि जून महिन्यात संपणार आहे. त्यामुळे येथे एप्रील आणि मे या महिन्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात. देशात सध्या कोरोना महामारीचे संकट आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये मतदान केंद्रांची संख्या वाढवली जाऊ शकते. नुकत्याच पार पडलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत प्रत्येक मतदान केंद्रावर 1200 ऐवजी 1000 मतदारांना मतदान करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे येथे मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात आली होती. त्यानंतर आता या पाच राज्यांमध्येसुद्धा मतदान केंद्रांची संख्या वाढवावी लागणार आहे.
Delhi: Election Commission to hold a meeting tomorrow to finalize the schedule for Assembly elections in 5 states.
— ANI (@ANI) February 23, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.