HW News Marathi
देश / विदेश

‘आजीचा आणीबाणी लावण्याचा निर्णय चूक, पण…’

नवी दिल्ली | माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १७७५ ते १९७७ या दरम्यान २१ महिने देशांतर्गत आणीबाणी लावली होती. इंदिरा गांधींचा तो निर्णय भारतीय राजकारणातील वादग्रस्त पान आहे. भाजपसह काँग्रेसचे सर्व विरोधक या निर्णयावर आजही टीका करत असतात. काँग्रेस नेते आणि इंदिरा गांधी यांचे नातू राहुल गांधी यांनी या विषयावर त्यांच मत प्रदर्शित केलं आहे. अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठाचे प्राध्यापक आणि देशाचे माजी आर्थिक सल्लागार कौशिक बसू यांना राहुल गांधी यांनी नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांना आणीबाणीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.

आणीबाणी लावणं चूक होती आणि त्या काळात जे काही घडलं तेदेखील चुकीचं होतं असं काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. प्रसिद्द अर्थशास्त्रज्ञ कौशिक बासू यांच्याशी चर्चा करत असताना राहुल गांधी यांनी हे विधान केलं आहे. “काँग्रेसकडून आणीबाणी लागू करणं एक चूक होती, पण पक्षाने कधीही घटनात्मक चौकट आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला नाही,” असं राहुल गांधींनी यावेळी म्हटलं. राहुल गांधी यांनी आणीबाणी चुकीची होती सांगताना सध्या देशात जे सुरु आहे ते आणीबाणीपेक्षा वेगळं आहे अशी टीका केंद्र सरकारवर केली.

“मला वाटतं ती (आणीबाणी) एक चूक होती. नक्कीच ती चूक होती. पण आणीबाणीच्या काळात जे काही झालं आणि सध्या जे काही सुरु आहे त्यात मुलभूत फरक आहे. काँग्रेस पक्षाने कधीही घटनात्मक चौकट आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला नाही. तशी आपल्याला परवानगीदेखील नाही. आपली इच्छा असली तरी आपण करु शकत नाही,” असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं.

“देशात स्वतंत्रपणे कार्य करणार्‍या संस्थांमध्ये संस्थात्मक समतोल राखला जात असल्यानेच आधुनिक लोकशाही कार्य करतात. भारतात त्या स्वातंत्र्यावरच हल्ला केला जात आहे. आरएसएस नावाची एक मोठी संस्था इतर सर्व संस्थांमध्ये प्रवेश करत आहे. हल्ला होत नाही अशी एकही संस्था नाही आणि हे अत्यंत पद्दतशीरपणे सुरु आहे,” अशी टीका राहुल गांधींनी केली आहे.“न्यायव्यवस्था, प्रेस, प्रशासकीय सेवा, निवडणूक आयोग…प्रत्येक संस्थेत अत्यंत पद्दतशीरपणे एक विशिष्ट विचारसरणी असणाऱ्या आणि एका ठराविक संस्थेच्या लोकांनी भरली जात आहे,” असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#SushanSinghRajput – पाटण्याहून आलेले एसपी विनय तिवारी बिहारला परतणार

News Desk

उद्धव ठाकरेंचे ‘हे’ बळ पुढे त्यांच्याच कामी येईल, मुनगंटीवारांचा टोला 

News Desk

नितीन गडकरींच्या लेटरबॉम्बवर अजित पवारांची प्रतिक्रिया..

News Desk