HW Marathi
देश / विदेश

इंधन दरांमध्ये घट कायम, पेट्रोल २० पैसे तर डिझेल १९ पैशांनी स्वस्त

मुंबई | इंधनाच्या दरांमध्ये सतत घट पाहायला मिळत आहे. आज (८ नोव्हेंबर) इंधन दरात पुन्हा एकदा घट झाली आहे. पेट्रोल २० पैसे आणि डिझेल १९ पैशांनी स्वस्त झाले आहे. यानुसार मुंबईतपेट्रोलची प्रतिलिटर किंमत ८३.७२ रुपये तर डिझेल प्रतिलिटर ७६.३८ रुपये एवढे पैसे मुंबईकरांना मोजावे लागणार आहेत.

राजधानी नवी दिल्लीतही इंधनाच्या दरांमध्ये घट झाली आहे. दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रति लिटर २१ पैशांनी कमी झालीय तर डिझेल १८ पैशांनी स्वस्त झाले आहे. यानुसार, दिल्लीकरांना प्रतिलिटर पेट्रोलसाठी ७८.२१ रुपये आणि डिझेलसाठी ७२.८९ रुपये द्यावे लागणार आहेत. बुधवारचा (७ नोव्हेंबर) दिवस वगळता गेल्या दोन आठवड्यांपासून इंधनाच्या दरांमध्ये सातत्याने घट होत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना थोडासा का होईना पण दिलासा मिळत आहे.

Related posts

देशातील सर्वात जास्त लांबीच्या पुलाचे पंतप्रधानांच्या हस्ते आज होणार उदघाटन

News Desk

पेट्रोल-डिझेलवर अनुदान दिले तर कल्याणकारी योजना बंद कराव्या लागतील

News Desk

सीबीएसई बारावीचा आज निकाल

News Desk