मुंबई | ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची आज (२६ डिसेंबर) यांच्या १०४वी जयंतीनिमित्ताने गुगलने खास डुडलद्वारे अभिवादन केले आहे. या खास डुडलमध्ये बाबा आमटे यांनी केलेल्या समाजकार्याचा आढावा घेणारे गुगलने ही पाच छायाचित्रांचा एक स्लाईड शो बनविला आहे. मुरलीधर देवीदास आमटे म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके बाबा आमटे होय. गांधीवादी विचारांनी प्रेरीत असलेल्या बाबा आमटे यांनी समाजातून डावललेल्या कुष्ठरोगींची सेवा सुरू केली. बाबांनी कुष्ठरोग्यांसाठी चंद्रपूरमध्ये आनंदवन आश्रम सुरू केले आहे.
Google Doodle pays tribute to social worker and activist Murlidhar Devidas Amte, affectionately known as Baba Amte on his 104th birthday anniversary
Read @ANI Story | https://t.co/UbGPyzAlZp pic.twitter.com/uQ6tbNQpz2
— ANI Digital (@ani_digital) December 25, 2018
बाबांच्या समाजकार्याची महती जगाला दाखवून गुगलने बाबा आमटेंना श्रद्धांजली वाहिली आहे. २६ डिसेंबर १९१४ साली विदर्भातील वर्धा जिल्ह्यात बाबा आमटेंचा जन्म झाला. श्रीमंत घराण्याची पार्श्वभूमी असलेल्या बाबा आमटे यांनी वयाच्या विशीतच वकिली व्यवसाय सुरू केला होता. परंतु, एका कुष्ठरोगीला पावसात भिजताना त्यांचे मन हेलावून गेले होते. त्यानंतर त्यांनी कुष्ठरोगींसाठी आयुष्य वाहून घेतले.
सन १९८५ साली बाबांनी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत भारत जोडो आंदोलन केले होते. देशात एकात्मतेचा संदेश देणे आणि पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यासाठी बाबांनी हे आंदोलन केले होते. बाबा आमटेंना त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. तर मानवाधिकार क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना युनाइटेड नेशन्सचाही अवॉर्ड प्रदान करण्यात आला. आपल्या कार्यातून जगाला प्रेरणा देणाऱ्या बाबा आमटेंनी ९ फेब्रुवारी २००८ रोजी अखेरचा श्वास घेतला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.