HW News Marathi
देश / विदेश

गोपीनाथ मुंडे अन् शरद पवार दोन्ही नेत्यांच्या वाढदिवसानिमित्ताने परळीत बॅनरबाजी

बीड | लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची उद्या (१२ डिसेंबर) जयंती या निमित्ताने संबंध परळी तालुक्यातमध्ये लोकनेत्यांना अभिवादन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी अभिवादानाचे बॅनर लावण्यात आले आहे. तर चौका चौकात लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे ४८ ते ५० फुटी कट आऊट बसवण्यात आले आहेत.

दुसरीकडे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सर्वेसर्वा शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर लावले आहे. धनंजय मुंडेंनी शरद पवार यांच्या प्रतिमांचे ४८ ते ५० फुट कटआऊट लावण्यात आले. तर राष्ट्रवादीच्यावतीने रांगोळीच्या माध्यमातून शरद पवारांचे प्रतिमा साकारली आहे. तसेच पवारांचे २० हजार स्क्वेअर फुटाचे तैलचित्र देखील परळीकारांना पाहण्यासाठी साकारण्या आले.

या बॅनबाजीमध्ये दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चढाव पाहायला मिळता आहे. धनंजय मुंडे यांच्या वतीने लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना अभिवानपर गोपीनाथ गडाच्या समोर मोठी कमान उभारली असून या कमानीवर लोकनेते गोपिनाथ मुंडे यांना विनम्र अभिवादन केल्याची कमान परळीकारांचे आकर्षणाचा भाग बनली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कामाख्या एक्स्प्रेसला शार्ट सर्किटमुळे आग, सुदैवाने मोठा अनर्थ टळला

News Desk

काँग्रेसनं महाराष्ट्र सरकारमधील पाठिंबा काढून घ्यायला हवा, दिग्विजय सिंहांच्या भावाची मागणी

News Desk

सीबीआय तपासातून काहीही साध्य होणार नाही, हाथरस प्रकरणावर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया

News Desk