HW Marathi
देश / विदेश

दिल्लीत दोन दहशतवादी घुसल्याच्या पार्श्वभुमीवर हाय अलर्ट

नवी दिल्ली | जैश-ए-मोहम्मद या संघटनेचे दोन दहशतवादी दिल्लीत घुसल्याची भीती स्थानिक पोलिसांनी व्यक्त केली आहे. यामुळे दिल्ली पोलिसांनी दहशतवाद्यांची ठिकठिकाणी छायाचित्रे लावण्यात आली असून पोलिसांकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा म्हणून या दहशतवाद्यांना कोठेही पाहिल्यास त्याची माहिती तातडीने सांगण्यात यावी, असे आवाहन केले आहे.दहशतवाद्यांना पाहिले तर पहाडडगंज पोलीस स्टेशनच्या ०११-२३५२०७८७ आणि ०११-२३५२४७४ या दोन संपर्क क्रमांकवर कळविण्यात यावे असे आवाहन केले आहे.

पंजाबमध्ये  रविवारी (१८ नोव्हेंबर)ला अमृतसर येथे निरंकारी भवनावर ग्रेनेड हल्ला झाला होता. या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले आहेत. हा हल्ला पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पंजाबसहीत नवी दिल्लीत हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.अमृतसरी हल्लात वापरण्यात येणारे ग्रेनेड हे पाकिस्तानी सैन्याकडून करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती तपासात उघड झाली आहे. यामुळे हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

 

 

Related posts

दोन दिग्गजांवर आज होणार अंत्यसंस्कार

अपर्णा गोतपागर

अवनीला ठार मारायचे नव्हते…पण परिस्थिती तशी होती !

News Desk

चाळीस महिने सत्तेत असून जुन्या सरकारवर टीका कशासाठी 

News Desk