नवी दिल्ली | भारताच्या इतिहासात आज दिवस हा सुवर्णक्षरांनी लिहिला जाणार आहे. इस्त्रोची महत्त्वकांक्षी चांद्रयान – २ मोहीम शनिवारी (७ सप्टेंबर) पहाटे १.३० ते.२.३० वाजताच्या सुमारास चंद्रावर उतरुन इतिहास रचला जाणार आहे. देशाच्या या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासींनी चांद्रयानाचे लँडिंग पाहतानाच फोटो सोशल मीडियावर पोस्ट करा, मोदी त्याला रिट्विट करणार असल्याचे ट्वीटमध्ये म्हटले आहे.
I urge you all to watch the special moments of Chandrayaan – 2 descending on to the Lunar South Pole! Do share your photos on social media. I will re-tweet some of them too.
— Narendra Modi (@narendramodi) September 6, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदीसोबत चांद्रयान-२ चे लँडिंग इस्रोमध्ये जाऊन ६० विद्यार्थी आणि शास्त्रज्ञांसमवेत बघणार आहेत. त्याआधी त्यांनी काही ट्विट करून देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.मोदींनी ट्वीटमध्ये असे देखील म्हटले की, ‘१३० कोटी देशवासीय ज्या क्षणाची वाट बघत आहेत, तो काही तासांवर आला आहे. देश आणि जग पुन्हा एकदा आमच्या शास्त्रज्ञांची शक्ती पाहील’, असे मोदींनी म्हटले.
The moment 130 crore Indians were enthusiastically waiting for is here!
In a few hours from now, the final descent of Chandrayaan – 2 will take place on the Lunar South Pole.
India, and the rest of the world will yet again see the exemplary prowess of our space scientists.
— Narendra Modi (@narendramodi) September 6, 2019
‘चंद्रापासून ३० किलोमीटर इतक्या अंतरावर गेल्यानंतर चांद्रयान-२ ची गती कमी करण्यात येणार आहे. ‘लँडर विक्रम’ला चंद्राच्या भूमीवर उतरवणे हे खूप मोठे आव्हान असणार आहे. ती १५ मिनिटे अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत. या सॉफ्ट लँडिंगनंतर चंद्रावर पोहोचणार भारत चौथा देश ठरेल.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.