HW News Marathi
देश / विदेश

राहुल गांधींना मौजमजेसाठी काश्मीरला जायचे असेल तर आम्ही व्यवस्था करतो !

नवी दिल्ली | “राहुल गांधी यांना जर फिरण्यासाठी आणि मौजमजेसाठी काश्मीरमध्ये जायचे असेल तर आम्ही त्यांची व्यवस्था करतो”, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लगावला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यांना शनिवारी (२४ ऑगस्ट) श्रीनगर विमानतळारूनच दिल्लीला परत पाठविले. यानंतर, काश्मीरमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचा केंद्राचा दावा खोटा असून सरकार राज्यातील सत्यस्थिती लपवत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. याच पार्श्वभूमीवर, संजय राऊत यांनी आता राहुल गांधींना हा टोला लगावला आहे.

“राहुल गांधी यांना जर फिरण्यासाठी आणि मौजमजेसाठी काश्मीरमध्ये जायचे असेल तर पर्यटन विभागाला आम्ही तशी विनंती करतो. त्यांची योग्य ती व्यवस्था करतो”, असा टोला संजय राऊत यांनी राहुल गांधींना लगावला आहे. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्राच्या या निर्णयावर काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणात टिका करण्यात आली होती. त्यानंतर “तुम्हाला आणायला विमान पाठवतो, स्वतः काश्मीरमध्ये येऊन इथली परिस्थिती पाहा”, असा खोचक टोला जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधी यांना खोचक टोला लगावला होता.

सत्यपाल मलिक यांच्या या टीकेला उत्तर देताना “विरोधी पक्षनेते आणि मी जम्मू काश्मीर, लडाखला भेट देतो. तुम्ही दिलेल्या निमंत्रणासाठी तुमचे आभार. मात्र, आम्हाला विमान पाठवण्याची आवश्यकता नाही. केवळ तेथे फिरण्याचे आणि तेथील सामान्य लोकांशी संवाद साधण्याचे स्वातंत्र्य आम्हाला मिळेल याची खात्री करा”, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. दरम्यान याच पार्श्वभूमीवर, जम्मू-काश्मीरमधील स्थिती पाहण्यासाठी, लोकांशी संवाद साधण्यासाठी राहुल गांधी अन्य विरोधी पक्षाच्या नेत्यांसह काश्मीरसाठी रवाना झाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महिलेला निर्वस्र करून भाजप नगरसेवकाचा कहर..

News Desk

उत्तर भारतात पुन्हा वादळाचा फटका, ४१ जणांचा बळी

News Desk

“भविष्यात असे राज्यपाल येऊ शकतात असं बाबासाहेबांना देखील वाटलं नसेल”- हसन मुश्रीफ

News Desk