HW News Marathi
देश / विदेश

भारतात बोईंग ७३७ मॅक्स-८ विमान वापरावर बंदी

नवी दिल्ली | इथिओपियन एअरलाइन्सचे बोईंग ७३७ हे विमान आदीसवरून नैरोबीला जात असताना कोसळले. या दुर्घटनेत ६ भारतीय नागरिकांसह १५७ जणांचा मृत्यू झाला आहे.या दुर्घटनेनंतर विमान सेवेच्या सुरक्षा तपासणीचा अहवाल येईपर्यंत या विमानसेवेवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) दिल्लीत आज (१३ मार्च) सायंकाळी ४ वाजता बैठक बोलविण्यात आली आहे.

विमानामधील त्रुटी दूर करुन त्यात सुधारणा होत नाही तोपर्यंत प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या विमानांचा वापर करता येणार नाही, असे डीजीसीएने म्हटले आहे. इंडोनेशिया व इथिओपिया या देशातील हवाई वाहतूक कंपन्यांच्या बोईंग विमानांच्या दुर्घटनेनंतर सर्व प्रथम चीनने आपल्या सर्व विमान कंपन्यांना बोईंग ७३७ मॅक्स ८ विमानांची सेवा बंद करण्याचे आदेश दिले.

त्यांनतर फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, सिंगापूर, ओमान, मलेशिया, नॉर्वे या देशांनीही बोईंग विमानांचा वापर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बोईंग ७३७ मॅक्स ८ या विमानांची सेवा बंद करण्याचा निर्णय भारतीय डीजीसीएने घेतला आहे. नागरी हवाई वाहतुकमंत्री सुरेश प्रभू यांनी डीजीसीए स्पाईस जेटने १४ विमान उड्डाणे थांबविली आहेत.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुलवामामध्ये २ दहशतवादी ठार

News Desk

Union Budget 2021 | शेतकऱ्यांना दीडपट जास्त MSP देणार – अर्थमंत्री

News Desk

नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यास शांततेवर चर्चा होऊ शकते | इम्रान खान

News Desk