जाकार्ता | भूकंप आणि त्सुनामीनंतर झालेल्या प्रचंड हानीनंतर आता इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. इंडोनेशियातील उत्तर सुलावेसीमधील माऊंट सोपुतन या ज्वालामुखीचा आज (बुधवारी) उद्रेक झाला आहे. इंडोनेशियात एका पाठोपाठ एक येणाऱ्या या नैसर्गिक आपत्तींमुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. इंडोनेशियात शुक्रवारी (२८ सप्टेंबर) ७.५ रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के बसले आणि त्यानंतर काहीच वेळात आलेल्या २ मीटर उंचीच्या त्सुनामीमुळे आधीच या देशात प्रचंड जीवितहानी झाली आहे.
A volcano erupted on Wednesday morning on the same central Indonesian island as an earlier earthquake. Mount Soputan in North Sulawesi province spewed ash 6,000 meters (19,700 feet) into the sky, reports AFP #Indonesia
— ANI (@ANI) October 3, 2018
प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांमधून या ज्वालामुखीच्या राखेचे लोट ४ हजार मीटर उंच पसरल्याचे निदर्शनास येत आहे. इंडोनेशिया आधीच्या नैसर्गिक आपत्तींमधून अद्याप पूर्णपणे बाहेर पडलेला नसतानाच आता उत्तर सुलावेसीमधील माऊंट सोपुतन ज्वालामुखीने देशाच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे त्सुनामी आणि भूकंप पीडितांसाठी सुरु असलेल्या बचावकार्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत.
इंडोनेशियातील आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. इंडोनेशियातील माऊंट सोपुतनच्या उत्तर पश्चिम भागात ज्वालामुखीमधून उठलेली राख आजूबाजूच्या प्रदेशातही पसरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्यातरी या ज्वालामुखीतून येणाऱ्या राखेमुळे देश आणि परदेशातील विमानसेवेवर कोणताही परिणाम होण्याची शक्यता नसल्याची माहिती बीएनपीडी या संस्थेने दिली आहे.
इंडोनेशियात ५ ऑगस्टच्या भूकंपात ४६० लोक मृत्युमुखी पडले होते. तसेच यापूर्वी २००४ मध्ये इंडोनेशियातील सुमात्रा बेटावर विनाशकारी भूकंप आणि त्सुनामी आली होती. या आपत्तीमुळे हिंदी महासागर प्रभावित झाला होता. भारताच्या तामिळनाडू किनारपट्टी भागातही या प्रलयाने हाहाकार उडाला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.