HW News Marathi
Covid-19

देशात २४ तासांत २ लाख ९५ हजारांच्या पुढे आढळले कोरोना रुग्ण

नवी दिल्ली | देशात कोरोनाचा कहर प्रचंड वाढत असून चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. देशात गेल्या २४ तासांत २ लाख ९५ हजार ४१ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत तर २०२३ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत १ लाख ६७ हजार ४५७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. देशात आतापर्यंत १ कोटी ३२ लाख ७६ हजार ३९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात सध्याच्या घडीला २१ लाख ५७ हजार ५३८ एक्टीव्ह रुग्ण आहेत.

तर दुसरीकडे महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ६२ हजार ९७ रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५४,२२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याने प्रमाण ८१.१४ टक्के इतकं झालं आहे. तसेच, आजपासून महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन लागणार असल्याचे संकेत ठाकरे सरकारमधील मंत्र्यांनी दिले आहेत. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नियमावली जाहीर करणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाची लस आधी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी लोकांसमोर येऊन घ्यावी, प्रकाश आंबेडकरांची मागणी

News Desk

२ दिवसात खत दरवाढ मागे घ्या, नाहीतर राज्यभर घंटानाद आंदोलन करणार !

News Desk

कुणाच्याही रोजी-रोटीवर निर्बंध आणावेत अशी इच्छा नव्हती, पण…! | मुख्यमंत्री

News Desk