HW News Marathi
देश / विदेश

मुंबईत होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणी संग्रहालय

विशाल पाटील | पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासन व बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यामध्ये आरे-गोरेगाव येथील प्रस्तावित असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणीसंग्रहालय सामंजस्य करार झाला आहे. मुंबईतील आरेचे जंगल परिसरात हे प्राणी संग्रहालय होणार आहे. जवळपास १५० किमीमध्ये हे प्राणीसंग्रहालय असनार आहे. महापालिकेच्या सभागृहात हा सामंजस्य करार झाला.

यावेळी महापालिकेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी हा सामंजस्य करार आदान प्रदान केला. मुंबई महापालिकेच्या निर्णयाचा इतिहास लिहला जाईल, त्यात आजच्या कराराची नोंद केली जाईल व प्राण्यांसाठी चालते बोलते विद्यापीठ आपण तयार करत आहोत, असे मुनंगटीवार यावेळी बोलत होते. तसेच उद्धव ठाकरे यांनी प्राणिसंग्रहालयाचे स्वप्न व्यक्त केले होते ते आज पूर्णत्वास होत आ, असे मुनगंटीवार म्हणाले आहेत.

आरे कॉलनी विकास हे आपल्या वचननाम्यात आहे | उद्धव ठाकरे

या सामंजस्य करारावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. राज्यात वाघांची संख्या वाढत असून त्यात वाघ प्रेमींची संख्या ही वाढत आहे, असे सुचक विधान भाजप शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांसाठी केले. आरे काॅलनीचा विकास हे शिवसेनेचे वचन आहे आणि ते आम्ही पूर्ण करत आहोत प्राण्यांना येथे आणून केवळ कोंबायचे नाही तर तेही मुंबईचे आहेत हे वाटले पाहिजे. ज्यावेळा मुंबईत पेंग्विन आणले त्यावेळी टीका करण्यात आली. मात्र पेंग्विन आता मुंबईचे झाले आहेत असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. रेस कोर्सवर आंतराष्ट्रीय दर्जाचे खुले मैदान उभारण्याची गरज आहे आणि ते आम्ही करणार आहोत असेही यावेळी ठाकरे म्हणालेत

Related posts

छत्तीसगढमध्ये मतदानापूर्वी नक्षलवाद्यांकडून आयईडी स्फोट

News Desk

“हिंदू जन आक्रोश मोर्चा मोदी आणि शाहांच्या भूमिकेविरूद्ध”, संजय राऊतांचा बोचरी टीका

Aprna

येडियुरप्पा देणार मुख्यमंत्री पदाचा राजीनामा ?

News Desk