HW Marathi
देश / विदेश

जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरच्या मृत्यूची पाकिस्तानी माध्यमांमध्ये चर्चा

नवी दिल्ली | जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अजहर याचा मृत्यू झाल्याची चर्चा पाकिस्तानी माध्यमांमध्ये सुरु असल्याची माहिती मिळत आहे. भारतीय वायू दलाने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये मसूद अजहर जखमी झाल्याचे पाकिस्तानी माध्यमांकडून म्हटले जात आहे. मात्र अद्याप पाकिस्तान सरकारने याबद्दलची कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. दरम्यान, “मसूद अजहर पाकिस्तानात असला तरी त्याची प्रकृती इतकी खालावलेली आहे कि तो घराबाहेर देखील पडू शकत नाही”, असा दावा काहीच दिवसांपूर्वी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी केला होता.

सविस्तर वृत्त लवकरच…

Related posts

थायलंडच्या गुहेतून आतापर्यंत ११ मुले बाहेर

News Desk

कॉंग्रेसने केले भारत बंदचे आवाहन

News Desk

नीरव मोदीला लवकरच अटक होण्याची शक्यता

अपर्णा गोतपागर