श्रीनगर | जम्मू कश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधातील ऑपरेशन सुरू असून अनंतनाग येथे आज (१७ जून) सकाळी झालेल्या चकमकीत लष्करातील मेजर आणि एक जवान जखमी झाला आहे. जखमींवर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच जखमी जवान हा १९ राष्ट्रीय रायफल्समधील असल्याची माहिती मिळाली आहे.
Jammu and Kashmir: An Army Major and a soldier have been injured in an encounter between security forces and terrorists in Anantnag. The injured troops belong to 19 Rashtriya Rifles. More details awaited
— ANI (@ANI) June 17, 2019
जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग परिसरात दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणेत जोरदार चकमक झाली. या चकमकीदरम्या सुरक्षा यंत्रणेला २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. अनंतनागमध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाल्यानंतर त्यांनी संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले. यादरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. जवानांदेखील दहशतवाद्यांच्या गोळीबारीला चोख प्रत्युत्तर दिले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.