HW Marathi
देश / विदेश

जेट एअरवेजचे चेअरमान नरेश गोयल यांचा राजीनामा

नवी दिल्ली | जेट एअरवेज या कंपनीचे चेअरमन नरेश गोयल आणि त्यांची पत्नी अनिता बोर्ड संचालक मंडळातून राजीनामा दिला आहे. जेट एअरवेज गेल्या काही दिवसांपासून कर्जबाजारीपणामुळे लवकरच दिवाळखोरीत निघण्याच्या मार्गावर आली आहे. यापूर्वीच राजीनाम्याची इच्छा व्यक्त करण्यात आली होती. गोयल यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना भावनिक पत्र लिहिताना कोणत्याही बलिदानासाठी तयार असल्याचे म्हटले आहे.

नरेश गोयल यांनी राजीनामा दिल्यानंतर आता जेटच्या कर्जपुरवठादारांच्या संघटनेचे सदस्य त्यांच्याकडील 51 टक्के भागीदारीचे एअरलाइन्समध्ये विलिनीकरण करू शकतात. त्यानंतर येत्या काही आठवड्यांमधये जेट एअरवेजसाठी नव्या खरेदीदाराचा शोध सुरू होणार आहे. गोयल यांच्या राजीनाम्यानंतर जेट एअरवेजला संकटातून बाहेर काढण्याची जबाबदारी सीईओ विनय दुबे यांच्याकडे आली आहे. जेट एअरवेजला आपातकालीन निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे वृत्त आहे.

जेट एअरवेज जी विमाने भाड्यावर घेतली होती. त्यांची देणी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहे. गोयल यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या हिस्स्यातील ५१ टक्के शेअर जेट एअरलाईन्सला मिळू शकतात. जेट एअरवेजवप सध्या २६ बँकांचे ८ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे.

यामध्ये खासगी आणि परदेशी बँकांचा समावेश आहे. कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक, इंडियन ओवरसीज बँक, अलाहाबाद बँक या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून जेटला कर्ज देण्यात आले होते.  जेट एअरवेजची तब्बल ४० विमाने जमिनीवर आहेत.

Related posts

मदरशांमध्ये नथुराम गोडसे, साध्वी प्रज्ञासारखी लोकं तयार होत नाहीत !

News Desk

जाणून घ्या…याआधी कधी भारतीय लष्करावर झाले दहशतवादी हल्ले

News Desk

महाराष्ट्र दिनाच्या पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

News Desk