HW News Marathi
देश / विदेश

 ‘मला कर्जबुडव्यांचा पोस्टर बॉय बनवलंय!’- विजय माल्या

नवी दिल्ली | गेल्या दोन वर्षांपासून बँकांचे नऊ हजार कोटी रुपये बुडवून इंग्लंडमध्ये पसार झालेला उद्योगपती विजय माल्या याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. भारतीय बँकांचे थकवलेले पैसे परत करण्याचा आपण पूर्णपणे प्रयत्न करत आहोत, असे माल्याने आपल्या पत्रात म्हटले आहे. परंतु आपल्याला बँकात घोटाळे करणाऱ्यांचा पोस्टर बॉय बनवले जात आहे असा उल्लेख माल्या यांने या पत्रात केला आहे.

मी १५ एप्रिल २०१६ रोजी नरेंद्र मोदी आणि वित्तमंत्री अरुण जेटली यांना पत्र लिहिले होते या पत्रांना दोघांनीही उत्तर दिलेले नाही. मात्र आता काही गोष्टी स्पष्ट करण्यासाठी मी ही पत्रे उघड करत आहे.” असेही माल्या यांनी पत्रात म्हटले आहे. सर्व सरकारी बँकांचे थकीत कर्ज परत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मात्र या प्रकरणात राजकारण घुसल्यामुळे मी काहीच करू शकत नसल्याचेही माल्याने म्हटले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नथुराम गोडसेला देशभक्त म्हणणाऱ्या प्रज्ञा सिंह यांनी सार्वजनिक माफी मागावी | भाजप

News Desk

“काँग्रेससोबत जाऊन शिवसेनेच्या बुद्धीचा ‘चक्काजाम’ झालाय ?”, शेलारांचा बोचरा सवाल

News Desk

“महाराष्ट्र आणि बंगालने दाखवलंय, मोदींचा पराभव करतो येतो!”

News Desk