HW News Marathi
देश / विदेश

परदेशात जॉब करण्याआधी खात्री करा, महाराष्ट्रमधील युवकाची फसवणूक करून बेदम मारहाण

प्रतिनिधी : उदय साबळे पाटील

उस्मानाबाद | उस्मानाबाद शहरात राहणारा कबीर शेख कामासाठी कंबोडिया या देशात गेला होता. मात्र, तेथे त्याच्यासोबत असं काही घडलं जे ऐकून तुमच्या ही अंगाचा थरकाप उडेल. कबीरला कंबोडिया या देशात सुमारे 5 हजार डॉलर एवढा पगार महिन्याला मिळेल, अशा प्रकारच्या जॉबची ऑफर देण्यात आली. एवढ्या चांगल्या जॉबची ऑफर आल्यानंतर नेमका जॉब कसा आहे हे पाहण्यासाठी कबीर पुण्याहून बेंगलूरू ते बँकॉक आणि मग बँकॉकहून कंबोडिया असा प्रवास करीत या कंपनीत पोहोचला. मात्र, कबीर जेव्हा कंपनीच्या पत्त्यावर पोहोचला तेव्हा त्याला त्या ठिकाणची परस्थिती पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण, त्या ठिकाणी एका कर्मचाऱ्याला बेदम मारहाण होत होती. त्या कर्मचाऱ्याच्या डोक्यात रॉडचा फटका मारण्यात आला होता तेव्हा तो कर्मचारी तडफडत असल्याचे कबीरने डोळ्यांनी पाहिले आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. दरम्यान, कबीर ज्या कंपनीत पोहोचला त्या कंपनीची भिंत 15 फुट उंच आणि त्याच्यावर तारेचे कुंपण होते. त्याचबरोबर, गेटवरती 30 सुरक्षा रक्षक होते. त्यामुळे परत तिथून वापस निघणे हे शक्य नव्हते.

आपण आता फसलो याची कबीराला जाणीव झाली

सदरील घटना पाहून कबीरला आपल्याला फसवण्यात आल्याची जाणीव झाली. त्यानंतर कबीरला त्या ठिकाणच्या लोकांनी आपल्या ताब्यात घेतले. त्याला भारतातीलच लोकांना फसवण्यास सांगितले. ते म्हणजे शादी डॅाट कॅाम, जीवनसाथी डॅाट कॅाम, डिवोर्सी डॅाट कॅाम या लग्नासाठी जोड्या जमवणाऱ्या साईटवर खोटी प्रोफाईल तयार करायची. सुंदर मुलींचे फोटो इंस्टाग्रामवरून डाऊनलोड करून घ्यायचे. प्रोफाईलवर जोडायचे आणि यानंतर भारतीयांसोबत चॅटींग सूरू करायची. यामध्ये ज्याची वर्षाची कमाई २० ते २५ लाख रुपये आहे, असं सांगून लोकांना फसवून त्यांना पैसे गुंतवण्यास सांगायचे आणि ते पैसे लुटायचे. अशा पद्धतीचे काम कबीर आणि त्याच्या सोबत असणार्‍या ७ भारतीय तरुणांना करण्यास सांगितले. जर हे काम व्यवस्थितपणे केले नाही तर त्यांना मारहाण देखील करण्यात येत होती अशी धक्कादायक माहिती कबीरने बोलताना दिली आहे. दरम्यान, कंपनीकडे असे सॉफ्टवेअर आहेत, जे एकाच वेळी 20 ते 30 व्हॉट्सअॅप खात्यांमध्ये लॉग इन करते. चिनी भाषेतील संदेश कोणत्याही भाषेत अनुवादित होतो. असे देखील काही सॉफ्टवेअर असल्याचे कबीरने सांगितले आहे.

अशी झाली कबीरची सुटका

कबीर आणि त्याच्या सोबत असलेल्या भारतीय तरुणांना कबीरने सांगितले की काहीही करून आपल्याला उद्या सकाळी येथून निघायचे आहे. कबीरने पूर्ण तयारी करण्यास सुरुवात केली. कबीरने त्या ठिकाणच्या स्थानिक पोलिसांना फोन केला आणि संपूर्ण घटनाक्रम सांगितला. कंबोडियन पोलीस कबीर आणि इतर लोकांच्या मदतीला धावून आले. यावेळी पोलिसांना आपल्या कंपनीतून फोन गेल्याची माहिती त्या ठिकाणच्या लोकांना समजली आणि त्यांनी पोलिसांना माहिती कोणी दिली याचा सर्वांना जाब विचारण्यास सुरुवात केली. यावेळी कबीराच्या डोक्यावर बंदूक देखील ठेवण्यात आली होती. मात्र, पोलीस येण्याची हे सर्व अडकलेले भारतीय तरूण पोलीस येण्याची वाट पाहत होते आणि त्यांना काही गोष्टीत अडकवून वेळ मारून नेत होते. अखेर कंपनीत कंबोडियन पोलीस पोहोचले आणि त्या ठिकाणी त्यांनी कबीर आणि इतर भारतीयांची सुटका केली. अजूनही 15 भारतीय मुले-मुली कंबोडियात अडकली आहेत. भयंकर यातना सहन करीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार भारतीय तरुणांना फसवणारे काही एजंट बिहार, बंगालमध्ये काम करत आहेत. कंबोडियातूनही मुलांना फसवून भारतात आणून त्यांच्याकडून हेच काम इथे करुन घेतलं जात आहे, अशी माहिती कबीरने बोलताना दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हाथरस प्रकरणाची पुढील सुनावणी २ नोव्हेंबरला

News Desk

“काँग्रेससोबत जाऊन शिवसेनेच्या बुद्धीचा ‘चक्काजाम’ झालाय ?”, शेलारांचा बोचरा सवाल

News Desk

राम मंदिराबाबत मनोज तिवारींचे वक्तव्य, म्हणाले…

News Desk