नवी दिल्ली | भारतीय बँकांचे तब्बल ९ हजार कोटी रुपये थकवून परदेशात फरार झालेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्याने आता एक अत्यंत खळबळजनक विधान केले आहे. “परदेशात जाण्याआधी मी अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली होती. तसेच समेट घडवून आणण्यासाठी मी जेटलींसमोर प्रस्तावदेखील ठेवला होता”, असे विजय माल्ल्याने लंडन येथील वेस्टमिंस्टर न्यायालयाबाहेर माध्यमांशी बोलताना केले आहे. विजय माल्ल्याच्या या विधानानंतर विरोधकांकडून अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे.
“विजय माल्ल्याचे विधान गंभीरतेने घेणे गरजेचे असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याप्रकरणी स्वतंत्र चौकशीचे आदेश द्यावेत,” असे म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जेटलींच्या राजीनाम्याचीदेखील मागणी केली आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस नेता पीएल पुनिया यांनी अर्थमंत्री अरुण जेटली आणि विजय माल्या यांना संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये चर्चा करताना पाहिले असल्याचा दावा केला आहे. तसेच माल्ल्या देश सोडून जाण्याचा दोन दिवस आधी या दोघांमध्ये चर्चा झाली असल्याचेही पीएल पुनिया यांनी म्हटले आहे.
Given Vijay Mallya’s extremely serious allegations in London today, the PM should immediately order an independent probe into the matter. Arun Jaitley should step down as Finance Minister while this probe is underway, tweets Rahul Gandhi (File pic) pic.twitter.com/s2jnkoAjZT
— ANI (@ANI) September 12, 2018
Arun Jaitly is lying. I saw him having prolonged meeting in Central Hall of Parliament about two days before he was allowed to escape from India. Choukidar is not only Bhagidar but also Gunahagar. @INCIndia @INCChhattisgarh https://t.co/VJkDk1ZCkK
— P L Punia (@plpunia) September 12, 2018
दरम्यान, विजय माल्याच्या विधानानंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याबाबत स्पष्टीकरण देणारे एक पत्रक जारी केले आहे. त्यांची आणि विजय माल्ल्यांची भेट झाली होती मात्र ती अधिकृत नव्हती, असे अरुण जेटली यांनी त्यात पत्रकात स्पष्ट केले आहे. विजय माल्ल्याचे हे विधान संपूर्ण चुकीचे असून २०१४ पासून मी मल्ल्याला भेटायची वेळच दिलेली नाही, असेही जेटली यांनी स्पष्ट केले आहे.
#WATCH Finance Minister Arun Jaitley says, "I never gave him an appointment" on Vijay Mallya's claim that he met the Finance Minister before he left. pic.twitter.com/aGxlD69NHY
— ANI (@ANI) September 12, 2018
Finance Minister Arun Jaitley's statement on Vijay Mallya's claim that he met the finance minister before he left. pic.twitter.com/oPrbZoO075
— ANI (@ANI) September 12, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.