HW Marathi
देश / विदेश

न्यूझीलंडमध्ये मशिदीत अंदाधुंद गोळीबार, बांग्लादेशची क्रिकेट टीम थोडक्यात बचावली

वेलिंग्टन | न्यूझीलंडच्या क्राइस्टचर्च भागामध्ये असलेल्या दोन मशिदीमध्ये अज्ञाताने अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. परंतु या गोळीबारात आतापर्यंत ६  जणांचा मृत्यू झाला, याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.  या गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. अज्ञाताने जवळपास ५० गोळ्या झाडल्याची माहिती मिळाली आहे.  “आजचा दिवस हा न्यूझीलंडसाठी काळा दिवस आहे,” असे न्यूझीलंडच्या पंतप्रधान जैकिंडा अर्डर्न यांनी म्हटले आहे.

गोळीबार झाली त्यावेळी बांगलादेशची क्रिकेट टीम मशिदीमध्येच उपस्थित होती. सुदैवाने बांगलादेशच्या सर्व खेळाडूंना आणि इतर उपस्थितांसह सुखरुप मशिदीबाहेर आणण्यात पोलिसांना यश आले आहे. बांगलादेशचा खेळाडू तमिम इक्बालने ट्वीट करत घटनेची माहिती दिली आहे. “बांगलादेशचा संपूर्ण संघ सुरक्षित आहे. अत्यंत संघर्षमय आणि भीतीदायक अनुभव होता.” बांगलादेशची टीम न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. शनिवारी (१६ मार्च) दोन्ही संघामध्ये तिसरा कसोटी सामना क्रिस्टचर्चमध्ये खेळवण्यात येणार आहे.

 

 

Related posts

महाशिवरात्री निमित्ताने देसभरात उत्साह

अपर्णा गोतपागर

निवडणूक लढविण्यासाठीच्या वयोमर्यादेवर निर्णय घेण्याचा अधिकार संसदेला !

News Desk

आरबीआयकडून रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांनी कपात

News Desk