HW News Marathi
देश / विदेश

राष्ट्रवादी व्यंकय्या नायडूंना “जय भवानी जय शिवाजी” लिहिलेली २० लाख पोस्टकार्ड पाठवणार

मुंबई | भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्या राज्यसभा खासदारकीच्या शपथविधीदरम्यान झालेल्या प्रकारानंतर राज्यातील राजकारण पेटायला सुरुवात झाली. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून राज्यसभेचे उपसभापती, उपराष्ट्रपती आणि भाजप ज्येष्ठ नेते व्यंकय्या नायडू यांना “जय भवानी जय शिवाजी” लिहिलेली तब्बल २० लाख पोस्टकार्ड पाठविण्यात येणार आहेत. उदयनराजेंनी बुधवारी (२२ जुलै) राज्यसभेच्या खासदारकीची इंग्रजीत शपथ घेतल्यानंतर “जय हिंद, जय महाराष्ट्र. जय भवानी, जय शिवाजी”ची घोषणा दिली. त्यावर नायडूंनी उदयनराजेंना समज दिली. याच प्रकारामुळे आता वाद निर्माण झाला आहे. भाजपविरोधात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यापूर्वी अयोध्या राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या मुद्द्यावर आपली नाराजी व्यक्त करणारे वक्तव्य केले होते. त्यानंतर, भारतीय जनता युवा मोर्चाने शरद पवारांच्या विरोधात अभियान राबवले. शरद पवारांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी ‘भारतीय जनता युवा मोर्चा’कडून “जय श्रीराम” लिहिलेली १० लाख पत्र पाठविण्यात येतील असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे, आता भाजप या अभियानाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून हे प्रत्युत्तर दिले जात असल्याचे म्हटले जात आहे. “राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून राज्यसभेचे उपसभापती व्यंकय्या नायडू यांना “जय भवानी जय शिवाजी” लिहिलेली तब्बल २० लाख पोस्टकार्ड पाठविण्यात येणार आहेत”, अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उर्जित पटेल यांच्याबाबत तुम्हाला या गोष्टी माहित आहेत का ?

News Desk

महात्मा गांधी आणि त्यांचे विचार अमर आहेत, त्या विचारांवर चालण्यासाठी दृढसंकल्प करुया! – अजित पवार

Aprna

जेईई ॲडव्हान्सड परीक्षेची तारीख जाहीर!

News Desk